केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचा नुकत्याच अमेरिका आणि कॅनडा दौऱ्यात त्यांनी, शिकागो येथे प्रमुख गुंतवणूकदार आणि व्यावसायिक नेत्यांसोबत एका उच्चस्तरीय व्यावसायिक गोलमेज परिषदेला संबोधित केले:
यादरम्यान त्यांनी भारताची सर्वसमावेशक प्रगती, त्याचबरोबर सुधारणांची गती आणि दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे कशा प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रात संधी निर्माण होऊ शकते यावर त्यांनी आपले विचार मांडले .
यावेळी , त्यांनी व्यावसायिकांना आणि गुंतवणूकदारांना भारताचा आणि जगाचा फायद्यासाठी आणि प्रगतीसाठी भारतात उतपादन करण्याचे आव्हान केले .यामध्ये , उत्पादन, एआय आणि डिजिटल, वित्तीय सेवा, पायाभूत सुविधा, अन्न प्रक्रिया, संरक्षण आणि प्रगत तंत्रज्ञान या क्षेत्रांमधील निर्माण होणाऱ्या संधींबद्दल त्यांनी आपले विचार मांडले .
त्या पुढे म्हणाल्या कि , जगाने, भारताकडे केवळ सेवा देणारी बाजारपेठ म्हणून न बघता , भारताची अभियांत्रिकी प्रतिभा, उत्पादन क्षमता आणि तंत्रज्ञान क्षेत्राचा लाभ घेऊन जगासाठी उभारणी करण्याकरिता एक व्यासपीठ म्हणून भारताकडे बघावे .
मग ते उत्पादन केंद्र असो, तंत्रज्ञान आणि संनशोधनाचं क्षेत्र असो, ग्राहक बाजारपेठ किंवा दीर्घकालीन पायाभूत सुविधा गुंतवणुकीचे ठिकाण असो; असं त्या यावेळी म्हणाल्या .







