उपत्तरप्रदेश मध्ये तेथील शासनाने , गायीचं गोमूत्र जमा करून त्यातून कश्या प्रकारे ग्रामीण भागातील जनतेला उत्पन्न मिळवता येईल याचा प्रयत्न सुरु केला आहे .
त्यातून ज्या स्त्रिया गायीचं गौमुत्र जमा करून आणतील त्यांना तिथे कमिशन दिल्या जाणार आहे आणि शेतकऱ्यांना प्रत्येक एक लिटर गोमूत्रावर आकारलेली रक्कम हि मिळणार आहे .
त्यातून ग्रामीण भागातील जनतेला आर्थिक पाठबळ मिळावं हा त्यामागील शासनाचा प्रत्यन आहे .
जवळपास पंधरा एक खेड्यांतून हे गोमूत्र गोळा करण्याचा हा सुरवातीचा त्यांचा प्रयत्न आहे .हे गोळा केलेलं गौमुत्र मुख्यतः शेतांमध्ये वापरण्यासाठीच उपयोगात आणल्या जाणार आहे असं तेथील शासनाचं म्हणणं आहे;
मात्र या प्रयोगामुळे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील स्त्रियांना , शेतकऱ्यांना त्याच बरोबर ज्यांचा कडे गुरे आहेत त्यांना यातून बराच आर्थिक आधार मिळेल असं काही त्या मागचा उद्देश तेथील शासनाचा आहे .







