कमिशन एजंट म्हणून काम करणारे लोक ते कोणासाठी किंवा कोणत्या कंपनीसाठी काम करत असले तरीही जर त्यांना नियमित पगार मिळत नसेल आणि केवळ कमिशनवरच अवलंबून राहावे लागत असेल, तर त्यांची परिस्थिती कित्येकदा अडचणीची असते .
ते कित्येकदा अतिशय कमी कमिशनवर काम करताना आपल्याला अनुभवायला मिळत.आणि संपूर्ण वर्षभर काम करूनही त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो; खूप परिश्रम करूनही कित्येकदा त्यांच्या हाती काहीच पडत नसल्याचे दिसून येते.
काही ठिकाणी त्यांना सहा टक्के कमिशन मिळते, तर काही ठिकाणी त्यांना आठ टक्के कमिशन मिळते, तर काही ठिकाणी दहा टक्के, तर काही ठिकाणी त्यांना थोडे अधिक कमिशन मिळते, तर काही ठिकाणी त्याहूनही कमी कंमिशन मिळते. परंतु, खूप काम करूनही अनेकदा त्यांच्या हाती काहीच पडत नाही, आणि काही क्षेत्रांमध्ये कंपन्यांनी त्यांना देऊ केलेले कमिशनही त्यांना मिळत नाही.
कारण, ज्या कंपन्या त्यांच्याकडून काम करवून घेतात, त्या त्यांना केवळ कमिशन देतात, पगार देत नाहीत. शिवाय, त्यांचे हे कमिशन त्यांनी कंपनीला किती नफा किंवा धंदा करून दिला दिला आहे, यावर अवलंबून असते. जर कंपनी तोट्यात चालली असेल, मग तिथे या हे लोक काम करत असले तरीही त्यांना काहीच मिळत नाही.
अशा प्रकारे, हे लोकं आपापल्या क्षेत्रांमध्ये अनेकदा संघर्ष करताना दिसून येतात आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबांनाही आर्थिक चणचणीचा सामना करावा लागतो.
हे लोकं आपल्याला मार्केटिंग च्या क्षेत्रात, औद्योगिक क्षेत्रात, कृषी क्षेत्रात , रिअल इस्टेट च्या क्षेत्रात, वित्त, वैद्यकीय, वस्त्रोद्योग आणि अशाच इतर अनेक क्षेत्रांमध्ये काम करत असल्याचे दिसून येते.
यापैकी काही जण चांगली कमाई करतात; परंतु, मोठ्या संख्येने असे लोक आढळतात जे खूप कष्ट करतात, तरीही त्यांची कमाई कमी असते आणि त्यांना वर्षभर आर्थिक संघर्षाचा सामना करावा लागतो.







