स्वित्झर्लंड येथील दावोस येथे होत असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये जगातील अनेक उद्योगपती आणि नेत्यांनी हजेरी लावली आहे असं चित्र बघायला मिळालं.
देशातील वेगवेगळ्या राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यानी सुद्धा तिथे हजेरी लावली आहे हे बघायला मिळत होतं.
वेग वेगळया देशातील उद्योगपती सुद्धा तिथे वेगवेगळया देशातील त्यांचा प्रतिनिधींसोबत बसुन व्यापार करार करत आहेत तर महाराष्ट्राने सुद्धा आपल्या राज्यात गुंतवणूकदारांना आकर्षित केली आहे अस बघायला मिळालं.
राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस हे दावोस येथे होत असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम च्या मंचावर उपस्थित आहेत आपल्या प्रतिनिधी मंडळा सोबत आणि आता पर्यन्त बर्यापैकी वेगवेगळया कंपन्यांसोबत जे महाराष्ट्र राज्यात गुंतवणुकीसाठी इच्छुक आहेत त्यांच्यासोबत सामंजस्य करार केलेले आहेत
आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच काम आणखी पुढे एक दिवस चालणार आहे त्यामुळे आणखी गुंतवणूकदारांना भारतात आणि महाराष्ट्र राज्यात गुंतवणूक करण्यास जे गुंतवणूकदार इच्छुक असतिल ते देशातील प्रतिनिधींसोबत भेटी गाठी घेताना आणि करतानाचे दृश्य हे आपल्याला बघायला मिळेल.
ह्या दरम्यान आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सुद्धा तिथे उपस्थिती दर्शविली अस बघायला मिळाल. त्याचबरोबर, झारखंड चे मुख्यमंत्री हेमंत सोरेन सुद्धा तिथे उपस्थित असल्याच बघायला मिळाल. गुजरात या राज्याचे मंत्री सुद्धा तिथे आपल्या राज्यात अधिकाधिक गुंतवणूक आणण्यासाठी विविध देशातील उद्योगपतींसोबत चर्च करत आहेत आणि करार करत आहेत अस बघायला मिळाल.
त्याचबरोबर आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा सुद्धा तिथे पोहचलेले तिथे बघायला मिळाले. फ्रांस चे पंतप्रधान इमानुएल मॅक्रोन यांनी सुद्धा तिथे हजेरी लावल्याच बघायला मिळाल व त्यादरम्यान चा त्यांचा डोळ्यांवर चस्मा लाऊन प्रसार माध्यमांसमोर येऊन फोटो काढणे किंवा मग भाषण करतानाचे फोटो प्रचंड प्रमाणात सगळ्या माध्यमांवर बघायला मिळाले हे बघायला मिळालं.
महाराष्ट्राने आता पर्यन्त दावोस मध्ये १४. ५ लाख कोटींच्या १९ सामंजस्य करारावर स्वाक्षरी केलेली आहे अस बघायला मिळाल. त्यामुळे सहाजिकच महाराष्ट्रामध्ये येणार्या काळात बर्यापैकी उद्योग क्षेत्रात गुंतवणूक होऊ शकते आणि उद्योग येऊ शकतात आणि त्यामुळे महाराष्ट्रमध्ये बऱ्याच युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. त्याच प्रकारे गुजरात, आसाम, आंध्रप्रदेश आणि झारखंड मध्ये सुद्धा गुंतवणूक आणण्यासाठी तिथले नेते मंडळी आणि त्यांचे प्रतिनिधी मंडळ हे काम करत आहे आणि ह्या राज्यांत सुद्धा बर्यापैकी गुंतवणूक येण्याची अपेक्षा आहे.







