नवीन वर्षाचा आज पहिला दिवस. म्हणजे जूनं वर्ष काल संपून आज नव वर्ष लागलं म्हणजे २०२५ हे वर्ष संपून २०२६ हे वर्ष सुरू झाल शेवटी!
अनेकांनी सरत्या वर्षाच्या शेवटी प्रचंड जल्लोष केला असेल. त्यामध्ये कोणी मस्तपैकी रात्री नव वर्ष सुरू होत पर्यन्त फटाके फोडले असेल.
कोणी आपल्या छोट्या मोठ्या टोळ्या घेऊन मस्त पैकी पार्टी वैगरे केली असेल. मस्त नाचण्या गाण्याचा आणि कुठे कोंबडी पार्टी तर कुठे मटण पार्टी झाली असेल आणि कुठे ओली पार्टी सुद्धा झाली असेल.
काल तसही शेवटाचा वर्षाच्या शेवटचा दिवस असल्यामुळे कोंबड्या विकणाऱ्यांच्या पिंजर्यात अनेक कोंबड्या दिसत होत्या.
त्याचबरोबर बकरे विकणारे सुद्धा आपले दुकान थाटून होते. त्यांच्या कडे सुद्धा काही बकरे दिसत होते आणि दारूच्या दुकानांत सुद्धा प्रचंड गर्दी ही संध्याकाळ पासून बघायला मिळत होती।
तर अश्या प्रकारे कित्येकांचा सरत वर्ष एन्जॉय करण्याचा विचार होता त्याचबरोबर नवीन वर्षाचा स्वागत करण्याचा विचार होता.
रस्ते सुद्धा संध्याकाळ पासून बर्यापैकी गजबजून गेल्याच चित्र जिकडे तिकडे बघायला मिळत होत.
तर कुणाचा आपल्या जुन्या वाईट सवयी ज्या मागील वर्षात लाऊन घेतल्या होत्या त्या सोडायचा विचार चालत असेल.
त्यामध्ये प्रचंड दारू पिण्याच व्यसन लागलेले लोकं, बायको पोरांच्या किंवा परिवाराच्या त्यांना दररोजच्या पडणार्या दटावणी मुळे दारू पिण्याच् व्यसन सोडण्याचा विचार ते करत असतिल.
तर ज्याला कुणाला दिवसातून अनेक बिड्या सिगारेट फुंकण्याची सवय लागली असेल ते कस बसे आपल्या मनाला समजावत असतील की आता खूप झाल सिगरेटा बिड्या फुकून. नवीन वर्ष आता लागत आहे आता तरी चांगल्या सवयी आपन लावूया ज्यामुळे दररोज आपल्याला घरच्यांकडून आणि लोकांकडून टोमणे पडत असतात.
तर त्यांना सुद्धा सरत्या वर्षा सोबत काही वाईट सवयी त्यागायची ईच्छा असेल. त्यात काही वाईट गोष्टी आणि सवयी त्यागायचे प्रयत्न त्यांचे या वर्षापासुन सुरू झाले असतिल.
स्त्रियांचा आणि मुलींचा सुद्धा जुन्या वर्षात काय काय गोष्टी नाही केल्या त्या नवीन गोष्टी करण्याची हौस त्यांना सुद्धा असेल.
कुणाला नवीन वर्षात नवा रोजगार मिळवण्याची, तर कुणाला नव्या वर्षात नवे मित्र मैत्रिणी आणि नव्या जागी फिरायला जाण्याची सुद्धा हौस असेल.
तर नवीन वर्ष येतांना सर्वांना नवीन उमेद आणि उत्साह देतो. प्रत्येकाला काहीतरी नवीन करायची ईच्छा असते. कुणाला काहीतरी नवीन शिकावस वाटत, तर कुणाला जुन्या रटाळवाण्या गोष्टी सोडण्याची इच्छा असते.
नव्या वर्षात सर्वांना नव्या गोष्टी होतांना बघायला आवडतात. तारुण्यात असलेल्या तरुणांचा या दिवसांत प्रचंड जल्लोष असतो. सरत्या वर्षाचा शेवटी रस्त्यांवरती त्यांचा प्रचंड जल्लोष सुरू असतो आणि हॉटेल्स आणि बार मध्ये प्रचंड गर्दी या दिवसांत बघायला मिळते व कुठे कुठे तरुणांनी प्रचंड हैदोस घातल्याचे सुद्धा लोकांना बघायला मिळते.
तर सगळ्यांची जगण्याची वेगळी पद्धत असते.
ज्यांची लग्न झालेली असेल त्या जोडप्यांचे वेगळे प्लॅनिंग असते पती पत्नी एकमेकांना नवीन वर्षाचा सुरुवातील सुंदर भेट वस्तु भेट देण्याचा किंवा मग कुठेतरी फिरायला जाण्याचा बेत आखत असतात. तरुण जोडपी असतिल तर ते कुठेतरी मस्त पैकी फिरायला जाण्याचा बेत करत असतात आणि म्हातारी जोडपी असतिल तर ते शांतपणे आपल नवीन वर्ष एकमेकांसोबत आणि मुलां बाळां सोबत आणि नातवंडांसोबत घालवण्याचा विचार करत असतात.
तर अश्या प्रकारे प्रत्येक जण नवीन वर्षात नव काही बदल करण्याचा, चांगल्या गोष्टी करण्याचा, नवीन वर्ष खास बनवण्याचा आणि सुंदर बनवण्याचा प्रयत्न करत असतात.
नवीन वर्ष येतांना नवी उमेद, उत्साह आणि नव चेतना घेऊन येतो. त्यामुळे माझ्या वाचकांना सुद्धा नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांसाठी हे नवीन वर्ष खूप सुंदर आणि रंगतदार होवो।







