दिल्ली येथील प्रगती मैदानावरील भारतमंडपम येथे आयोजित १८ व्या ब्रिक्स परिषदेला ११ वेगवेगळ्या देशातील राष्ट्रप्रमुखानी आणि प्रतिनिधींनी हजेरी लावली होती. हि परिषद तीन दिवस चालली . या परिषदेचे यजमानपद या वेळी भारताला मिळालं होत .
या परिषदेमुळे , रशिया चे राष्ट्रप्रमुख ब्लादिमीर पुतीन , चीनचे राष्ट्रप्रमुख शी जिनपिंग आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच व्यासपीठावर दिसले . शी जिनपिंग यांचा सात वर्षानंतर भारताचा हा पहिलाच दौरा होता .
या परिषदेमध्ये विकसनशील देशांचा समूहांना अधिक बळकट करण्यावर आणि जागतिक प्रशासनात सुधारणा करण्यावर भर देण्यात आला .
ब्रिक्स हा ,हा उदयोन्मुख आणि विकसनशील अर्थव्यवस्थांचा एक प्रभावशाली आंतरराष्ट्रीय गट आहे. याची स्थापना २००९ मध्ये झाली होती. सुरुवातीला यात ब्राझील, रशिया, भारत आणि चीन हे देश होते, नंतर दक्षिण आफ्रिका सुद्धा जोडला गेला.
आता या गटाचा विस्तार होऊन यात इजिप्त, इथियोपिया, इराण, युएई, सौदी अरेबिया व इंडोनेशिया यांचाही समावेश झाला असून आता त्यांची एकूण सदस्यसंख्या ११ झाली आहे. या परिषदेला संबोधित करताना चीन चे राष्ट्र प्रमुख शी जिनपिंग यांनी ब्रिक्स राष्ट्रांमध्ये अधिक सहकार्याची आवश्यकता आहे असं मत मांडलं .
त्याचबरोबर , ते म्हणाले कि विस्तारित गटाने औद्योगिक आणि पुरवठा साखळ्यांची स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी आणि एकात्मिक बाजारपेठ विकसित करण्यासाठी अधिक कार्य करण्याची गरज आहे त्याचसोबत संशोधन आणि उद्योगात ब्रिक्स राष्ट्रांकडून अधिक मोठ्या सहकार्याची आवश्यकता आहे या प्रकारचं मत त्यांनी या दरम्यान मांडलं.
ज्यामध्ये संशोधन केंद्र उभारणे , पारंपरिक उद्योगांचे आधुनिकीकरण करणे, उदयोन्मुख क्षेत्रांचा विकास करणे आणि भविष्यातील उद्योगांसाठी नियोजन करणे या बाबींचा सामावेश हा होता .
ब्रिक्स परिषदेमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी , ग्लोबल साऊथ हा जागतिक संकटाचा आघाडीवर आहे मात्र निर्णय प्रक्रियेत पिछाडीवर आहे अश्या भावना व्यक्त केल्या.







