मराठी मनोरंजन जगासाठी वैदेही परशुरामी हे काही नवखं नाव नाही. तिने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये बरच काम केलेलं आहे आणि हे आपल्याला आपण जेव्हा तिच्या चित्रपटांची संख्या बघतो तेव्हा कळत
आणि आपल्या कामाद्वारे तिने मराठी चित्रपटसृष्टी मध्ये आपली ओळख निर्माण केली आहे.
तिने यापूर्वी मराठी चित्रपटसृष्टीसाठी काम करताना, कोकणस्थ, लोच्या झाला रे , वृंदावन, वेड लावी जिवा ,फ्रेंडशिप अनलिमिटेड ,डॉक्टर काशिनाथ घाणेकर, जग्गू आणि ज्युलिएट , झोम्बीवली , संगीत मानापमान या प्रकारच्या चित्रपटांत काम केलेले आहे हि विशेष .
त्यामुळे महाराष्ट्रामध्ये तिच्या चाहत्यांची मुळीच काही कमतरता नाही . तिला नृत्य करायला आवडत आणि ती कत्थक सुद्धा शिकलेली आहे त्यामुळे तिच्या नृत्यांचे सुद्धा नेहमी कार्यक्रम राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी हे होत असतात आणि त्या कार्यक्रमांना तिचा चाहत्यांचा बराच प्रतिसाद हा लाभत असतो .
सोशल मीडिया वर भटकंती करत असताना तिचे काही सध्या टाकलेले छायाचित्र समोर आलेत ज्यांनी तिच्या चाहत्यांचं लक्ष त्या छायाचित्रांकडे आकर्षित केलं .
ह्या टाकलेल्या छायाचित्रात ती अतिशय सुंदर दिसत होती आणि तिच्या चाहत्यांकडून त्या छायाचित्रांवर भरभरुन प्रतिसाद मिळाला हे त्यावेळी बघायला मिळालं .
वैदेही परशुरामी हिने सिम्बा सारख्या हिंदी चित्रपटात सुद्धा काम केले आहे हे इथे विशेष तर वैदेही परशुरामी पुढे सुद्धा अश्याच प्रकारे आपल्या कामाद्वारे आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करत राहो ह्या शुभेच्छा तिला तिच्या पुढील येणाऱ्या चित्रपटांसाठी आणि प्रोजेक्ट साठी इथे देऊया .







