मुंबई शहरातील प्रॉपर्टी म्युटेशन (मालमत्ता नोंद बदल) प्रक्रियेसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे, ज्यामुळे कलेक्टर कार्यालयात होणारी कागदपत्रांची कटकट आणि प्रत्यक्ष फेऱ्या आता पूर्णपणे कमी होणार आहे .
अनिवासी भारतीय असोत, ज्येष्ठ नागरिक असो किंवा कोणत्याही नागरिकाला प्रॉपर्टी कार्डमध्ये नाव बदल/दुरुस्ती करायची असो ह्या प्रक्रिया आता सहज पार पडल्या जाऊ शकतील .
अर्जदारास कुठूनही, कधीही अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध असेल त्यामुळे कार्यालयांमध्ये चकरा मारायची गरज राहणार नाही .
त्याचबरोबर याबद्दल प्रत्येक टप्प्यावर SMS द्वारे अपडेट मिळेल आणि पूर्ण पारदर्शकता त्यामध्ये असेल .
जलद व कार्यक्षम प्रक्रिया त्यामुळे लोकांना मिळेल आणि कामांना होणार उशीर हा कमी होईल
त्याचबरोबर या प्रक्रियेमध्ये २४x७ ऑनलाइन ट्रॅकिंग असेल त्याच बरोबर अर्जाची स्थिती तत्काळ पाहता येणार आहे
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राबविण्यात आलेला हा उपक्रम नागरिक सेवांना अधिक वेगवान, सुलभ आणि आधुनिक बनविण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा एक भाग आहे. अश्या प्रकारची माहिती महसूल विभागाकडून आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून या प्रकारचा प्रतिक्रिया मांडण्यात आल्या
अर्ज करण्यासाठी अर्जदार या लिंक वर जाऊन अर्ज करू शकतात हे त्यांनी त्यादरम्यान नमूद केलं . लिंक हि खाली दिली गेली आहे .
epsitmumc.mahabhumi.gov.in







