मायक्रोसॉफ्ट चे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी नुकताच भारतात भेट दिली या दौऱ्यात त्यांनी भारतातील या कडक उन्हाळ्याचा दिवसांत सुद्धा काही वेळ शेतकर्यांच्या समस्या समजून आणि जाणून घेण्यासाठी शेतकर्यांसोबत वेळ घालवला,
त्यांच्याकडून त्यांना असणार्या समस्या आणि आव्हाने जाणून घेण्याचा त्यांनी या दरम्यान प्रयत्न केला त्याचबरोबर या दरम्यान त्यांनी केंद्रीय कृषि मंत्री शिवराजसिंह चौहान यांची सुद्धा भेटले आणि देशातील शेतकर्यांच्या काय समस्या आहे आणि काय आव्हाने आहेत आणि कश्या प्रकारे आधुनिक शेतीला प्रोत्साहन देता येईल आणि लोकांच्या जिवनात आणि शेतकर्यांच्या जीवनात बदल घडवता येईल याबद्दल चर्चा केली आणि त्या प्रकारे सहकार्य करण्याबद्दल सुद्धा ते पुढे बोलले.
त्याचबरोबर भाजपा सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न कशा प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत हे सुद्धा या भेटीत बिल गेट्स साहेबानी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर बिल गेट्स साहेबांनी भारत देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची भेट घेतली तिथे त्यांनी विकसित भारताचा मुद्द्यावर चर्चा केली.
AI चा कशाप्रकारे समाजाला उपयोग होऊ शकतो आणि AI प्रणाली देशात आणखी विकसित करण्यासाठी आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कश्या प्रकारे सहकार्य करता येईल आणि त्याच बरोबर देशातील वेगवेगळ्या आव्हानां बद्दल सुद्धा पंतप्रधानांशी चर्चा केली. या दरम्यान बिल गेट्स यांनी पंतप्रधानांना ‘source code’ पुस्तक सुद्धा भेट दिल.
बिल गेट्स यांची भेट महाराष्ट्राचे मुख्यमन्त्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. या चर्चेत महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारची आवाहने महाराष्ट्रातील लोकं आणि सरकार अनुभवत आहेत या बद्दल जाणून घेण्याचा या बिल गेट्स यांनी प्रयत्न केला.
शेतकर्यांचा मुद्द्यांवर. स्त्रियांच्या मुद्द्यावर, युवकांच्या मुद्द्यांवर, आरोग्याबद्दल च्या मुद्द्यावर या दरम्यान चर्चा झाली.
पुढे मुम्बई मध्ये त्यांनी देशाचा लाडका क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकर यांची भेट घेतली आणि त्यांच्या सोबत काही वेळ घालवा. सचिन तेंडुलकर सोबत बसुन बिल गेट्स साहेबानी मुंबई च्या लोकांचा आवडता वडापाव खाण्याचा आनंद घेतला.
दोघांनी मिळून वडा पाव खाण्याचा आनंद घेतला आणि त्याचे त्यांनी आपापल्या Instagram अकाऊंट वर विडिओ सुद्धा टाकले. त्याचबरोबर सचिन सोबत बिल गेट्स साहेबानी टेनिस आणि क्रिकेट सुद्धा खेळण्याचा आनंद घेतला तर अश्या प्रकारे बिल गेट्स साहेबानी आपला भारत दौरा अर्थपूर्णपणे पूर्ण केला.
एवढ्या कडक उन्हाळ्याचा दिवसांत बिल गेट्स यांनी एवढी दगदग करून भेट दिली आणि भारतीय संस्कृती, तिथे काय काय नवीन होतेय आणि कश्या प्रकारे भारत विकास करत आहेत.
शेतीच्या क्षेत्रात, AI च्या क्षेत्रात, उद्योगाच्या क्षेत्रात, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात, कश्या प्रकारे भारतामध्ये कार्य सुरू आहे हे ह्या सगळ्या गोष्टी बिल जाणून घेण्याचा प्रयत्न केला.