पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत निवासी घरांच्या छतावर सौर यंत्रणा बसवण्याच्या कार्याला देशभरात वेग आला आहे.
देशातील एकूण छतावरील सौर यंत्रणांपैकी जवळपास २०% सौर यंत्रणा महाराष्ट्रात असून, या बाबतीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. या प्रकारची माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांनी दिली .
या बाबतीत महाराष्ट्राने उत्तरप्रदेश , गुजरात आणि आंध्रप्रदेश या राज्यांना सुद्धा मागे टाकले आहे .
महाराष्ट्रात छतावर सौर यंत्रणा बसविणाऱ्यांची संख्या राजस्थान, आसाम , छत्तीसगढ आणि ओडिशा या चार राज्यांच्या एकत्रित यंत्रणा बसवाण्या पेक्षा अधिक आहे असं ते म्हणाले .
तसेच केरळ , हरयाणा , मध्यप्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर या राज्यांचा छतावरील सौर यंत्रणा स्थापनेपेक्षाही महाराष्ट्र या मध्ये पुढे आहे .
पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत देशात स्वच्छ, शाश्वत आणि परवडणाऱ्या ऊर्जेच्या वापराला चालना मिळत असून, नागरिकांच्या घराघरात सौरऊर्जेचा प्रसार वेगाने होत आहे आणि महाराष्ट्राने या मोहिमेत अग्रस्थान मिळवत स्वच्छ ऊर्जा स्वीकारात देशाला दिशा दिली आहे.
अश्या प्रकारच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सोशल मीडिया हॅन्डल वर व्यक्त केल्या .







