नुकताच लागलेले महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील निकाल हे राज्यातील आणि देशातील लोकांकरिता अतिशय आश्चर्यकारक आणि अनपेक्षित होते अश्या प्रकारच्या निकालांची अपेक्षा कदाचित लोकांना नसेल. अस म्हणायला बर वाटत की महायुतीने, महाविकास आघाडी आणि बाकी च्या प्रादेशिक आणि छोट्या, मोठय़ा पक्षांची धूळधाण उडवल. मात्र संपूर्णतः एकतरफ़ा निकाल येणे हे लोकशाही साठी योग्य नसते हे आज आम्हाला समजणे आवश्यक आहे.
कित्येकदा अश्या प्रकारचे निकाल लागल्यावर प्रशासन व्यवस्थेवर, यंत्रणेवर प्रश्ण चिह्न निर्माण होतात. कारण ज्या प्रकारचे निकाल आम्हाला महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीत बघायला मिळाले आणि ज्या प्रकारे फक्त महायुतीचेच उमेदवार संपूर्ण राज्यात निवडून येतानाचे चित्र निकालाच्या दिवशी दिवस भर बघायला मिळत होते, यावरून फक्त अस जाणवत होत की,
महाराष्ट्रातील जनतेसाठी फक्त महायुतीच्या लोकांनी कष्ट घेतलेत आणि बाकीच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुळीच महाराष्ट्राच्या लोकांच्या समस्या आणि त्यांचे समजून घेण्याचा आणि सोडविण्याच्या मागील काळात प्रयत्न केले नाही.
मात्र असं होऊ शकत का हा प्रश्न लोकांनी स्वतःलाच विचाराव. राष्ट्रीय पक्ष असो अथवा प्रादेशिक पक्ष असो, जीत, पराजित जमिनीवर त्यातले किंवा त्या पक्षातील अनेक कार्यकर्ते कार्य करत असतात आणि होते. मात्र आमची महाराष्ट्रातील जनता, आम्हाला अनुभवायला मिळत की आजही अनेको गावा खेड्यांतील आणि शहरातील सुद्धा फक्त मागचा पुढचा विचार न करता (पक्षाच् चिन्ह) बघून धडाधड मतदान कक्षात गेल्यावर आंधळेपणाने एखाद्या पक्षाच्या चिन्हावर बटन दबातात. त्यांना याच्याशी काहीही देणे घेणे नसते की आमच्या क्षेत्रात आमच्या साठी काम करणारा आमचा नेता कसा आहे. तो शिकलेला आहे की गुन्हेगार आहे, की तो शिकलेला नाही की मग तो एखाद्या शाही घराण्याचा आहे किंवा त्याने आपल्या क्षत्रेतात किती आपले काम केलेली आहे किंवा केलेली नाहीत , फक्त कित्येकदा त्यांना चिन्हाशी देने घेणे असते आणि त्या चिन्हावर लढणाऱ्या पक्षाशी.
आणि या विधानसभा निवडणुकीत लोकांनी आपल्या क्षेत्रातील उमदेवार बघून नाही तर (पक्षाच चिन्ह) बघुन आणि ते उमेदवार महायुतीचे आहेत की महा विकास आघाडीचे आहेत हे बघून मते दिलेली आहेत अश्या प्रकारची चित्र आम्हाला बघायला मिळाल.
त्यामुळे कित्येक लोकांसाठी प्रामाणिकपणे काम करणारे नेते जरी ते छोट्या पक्षातील असो अथवा मोठ्या पक्षातील असो अथवा आघाडीतील असो त्यांना लोकांच्या अज्ञानामुळे पराभव पत्करावा लागला. फक्त पक्षाच (चिन्ह बघुन) संपूर्ण गावाने त्याच पक्षाला मतदान केलं अश्याप्रकारच चित्र होतं आणि त्या प्रकारचे निकाल सुद्धा नुकताच झालेल्या निवडणुकीचा निकालात बघायला मिळत होते.
आंधळे पानाने जर का आमचे मतदान झाले असेल तर आम्हाला आमच्या करिता प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारे आमचे नेते कशे आहे याची जाणीव नसेल आणि कोणते लोकं आमच्यासाठी प्रामाणिकपणे काम करत होते याची कल्पना नसेल आणि त्यामुळे जर का त्यांना तुमचा प्रश्नांची समस्यांची जाणीव नसेल तर येणार्या काळात सुद्धा लोकांची प्रश्न ते सोडवू शकणार नाहीत त्यामुळे लोकांना आंधळे पनाने फक्त (एखाद्या पक्षाच् चिन्ह) आणि उमेदवार आणि त्याच काम न बघता मतदान केल्याचे झळ संपूर्ण पाच वर्षभर सोसावी लागतील.
महाराष्ट्रातील समस्या मुख्यतः आदिवासी भागातील मराठवाड्यातील, पश्चिम महाराष्ट्रातील, कोकणातील, विदर्भातील ह्या अनेक आहेत. त्या मागील अनेक वर्षापासुन जवळपास तश्याच आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रात लोकांची, युवकांची, स्त्रियांची, शेतकर्यांच्या अवस्था अत्यंत दयनीय आहेत.
एकाद्या पक्षाच् फक्त चिन्ह बघुन आंधळे पनाने मतदान करण्याचे परिणाम आणि परिश्रम करणारे, काम करणारे लोकं न बघता मतदान न करण्याचे परीणाम आपले प्रश्न तसेच राहण्यात होईल यात मुळीच शंका नाही.
त्याच बरोबर अश्या प्रकारचे निकाल येण्यामुळे EVM वर सुद्धा प्रश्ण निर्माण होतो. कारण प्रकारे आकडे बघायला मिळालेत ते खरच सामान्य माणसाला विचार करायला लावणारे आहेत.