नाशिक मध्ये विश्व् मराठी गौरव दिनाच्या दिवशी , मराठी साहित्य संमेलन सुरु झाले. या मराठी साहित्य संमेलनाला महाराष्ट्र राज्याच्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार , मंत्री छगन भुजबळ, मंत्री उदय सामंत, मंत्री गिरीश महाजन हे उपस्थित होते .
विश्व् मराठी भाषा गौरव दिनानिमित्त, नाशिक येथील पवित्र भूमीवर होत असलेल्या या मराठी साहित्य संमेलनाबद्दल अत्यंत आनंद होत आहे असं ते त्यांचा भाषणादरम्यान म्हणाले . याच वर्षी नाशिक येथे मराठी भाषेचा कुंभ आणि संस्कृतीचा कुंभ सुद्धा भरणार आहे
असं त्यांनी नमूद केलं आणि या दरम्यान मराठी भाषेच्या कुंभमेळ्यात जगभरातून आलेल्या सगळ्या मराठी मंडळींना त्यांनी पुढील वर्षी होणाऱ्या सिहंस्थ कुंभ मेळ्याचे सुद्धा निमंत्रण दिले .
या साहित्य संमेलनात अनेक प्रतिभावान व्यक्तींना पुरस्कार देण्यात आले आहे त्यामुळे , महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारांचे महत्व आणि माहात्म्य अधिक वाढले असं ते या दरम्यान म्हणाले . पुढे ते म्हणाले कि या व्यक्तींचे कार्य बघता मराठीचा रथ हा आवरितपणे असाच पुढे जात राहील आणि मराठी भाषेचे सर्व सारस्वत मराठी भाषेची अस्मिता ही ते जिवंत ठेवतील ही आशा आहे असं ते पुढे म्हणाले.
नाशिक ही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची भूमी असून त्यांनी आधुनिक महाराष्ट्रात मराठी भाषा शुद्धीच केलेलं कार्य हे अत्यंत महत्वपूर्ण आहे .
एआयच्या युगात भाषेसमोर अनेक आव्हाने आली तरी अभिजात साहित्याला कोणतेही आव्हान पराभूत करू शकत नाही. आजही आपल्या साहित्यिकांमध्ये अभिजात साहित्यनिर्मितीची ताकद आहे आणि एआयसह नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मराठी साहित्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे असं ते म्हणाले. .
मराठीचा अभिमान साजरा करण्यासाठीच मराठी विश्व संमेलन आयोजित केले जाते. त्यामुळे पुढील संमेलन विदर्भात आयोजित होईल अशी आशा आहे. तसेच आगामी काळात हे संमेलन परदेशात घेण्याचा प्रयत्न केला जाईल असं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले .







