कुत्र्यांच्या वायफळ भुंकण्याने लोकांना काहीही फरक पडत नाही. मात्र भुंकून भुंकून हे मात्र शेवटी थकून जातात आणि गावात अश्या वायफळ भुंकणारया कुत्र्यांची काहीही कमतरता नसते. भुंकून भुंकून बिचारे रात्री टाईट होऊन झोपतात.
पुढे गरीब, गरजू, कामगार लोकांना टार्गेट करने आणि त्यांना अपमानीत करने हे जर त्यांच काम असेल तर समोर जाऊन यांना त्या लोकांची साथ लाभत नाही.
गावातील लोकं म्हणजे यांच्या साठी जनावरं, जेव्हा वाटेल तेव्हा त्यांना गाड्यांमध्ये भाड्याने घेऊन या आणि आपल्या सभेत मेंढरासारखे बसावा आणि त्यांच्या कडून आपली वाहवा करून घ्या, कधी मुजरा करवून घ्या, तर कधी त्यांच्या कडून जोडे पुसून घ्या तर कधी आपल्या घरच्या गाड्या धुवून घ्या तर कधी, त्या कर्मचार्यांना भाजीपाला आणायला पाठवा अशी या दिवसांत परिस्थिती दिसते.
सरकारी कर्मचारी या लोकांसाठी यांच्या घरात काम करणारे गडी त्यांची काही किम्मत नाही अश्या प्रकारे या दिवसांत या लोकांच्या कचरा केला जातो आणि अपमानित केल्या जाते.
गोरगरीब गाव खेड्यातील जनता म्हणते, साहेब आमच्या गावातील प्रश्न लयी आहे, रस्त्यावर खड्डे खूप आहेत. प्रत्येक वर्षी नवीन रस्ता तुमचे लोकं तयार करतात आणि प्रत्येक वर्षी त्या रस्त्यावर खड्डे पडतात.
मग कश्या प्रकारचे रस्ते तुमचे लोकं रस्ता तयार करतात? गावात शेतकऱ्यांचे प्रश्ण कमी होत नाय आणि तुम्ही म्हणता आम्ही शेतकर्यांची प्रश्ण सोडवतो आहोत, पण शेतकर्यांचे प्रश्ण दरवर्षी वाढतच जातात. मग तुम्ही करता काय?
गावातील तरुण आणि तरुणी शिकून सुद्धा मोठ्या प्रमाणात बेरोज़गार राहतात आणि तुम्हा लोकांना सम्पूर्ण पाच वर्षाचा कार्यकाळ मिळून सुद्धा त्या तरुण मुलांचे प्रश्ण सुटत नाही त्याऐवजी त्या तरुणांना तुम्ही आपल्या मागे टिंग टिंग लंगोटी म्हणुन फिरवता.
त्यांना कधी जातीच्या नावाने अपमानित करता, तर कधी गरिबीचा लेकरू किंवा भिकार्यांचा लेकरू म्हणुन हिणवता, ह्या अश्या प्रकारच्या वागण्यामुळे त्या लोकांची परिस्थिती कशी काय सुधारणार?
मात्र हे लोकं हे विसरून जातात की तेच गावातील लोकं त्यांना मतदानाच्या वेळी उन्हातान्हात मोठमोठय़ा रांगेत गर्दीत उभे करतात मतदान करतात आणि त्या लोकांच्या मतदानाच्या बळावर हे त्यांचे लोकप्रतिनिधी म्हणुन उभे राहतात. आणि त्या मतदार संघातील लोकांसाठी काम करण्यासाठी, त्या लोकांचे जे काही छोटे मोठे प्रश्ण आहेत ते प्रश्ण सोडविण्यासाठी आणि गावाचा किंवा आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आम्हाला ठराविक काळ मिळतो.
मात्र तो काळ हे लोकं आपली संपत्ति वाढण्यात घालवतात. त्यामुळे मग त्यांचा मतदारसंघात अनेक लोकं पूर्वीच्याच सारख्याच समस्यांनी बेजार असतात. गावातील बसस्थानके बघा, रेल्वे स्थानके बघा, गावातील सरकारी दवाखाने बघा गावातील सरकारी शाळा बघा, गावातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या इमारती बघा, गावातील खेळाचे मैदाने बघा, गावातील सार्वजनिक शौचालये बघा, अत्यंत वाईट परिस्थिती मध्ये असतात म्हणजे कुत्रे ही जाऊन मुतायला जायला हजार दा विचार करतील तर मग लोकं कशे जाणार?
त्याच बरोबर, पाण्याचा टाक्या असेल तर कोरड्या पडलेल्या किंवा मग किंवा निकामी झालेल्या आणि तिकडे यांचे बंगले बघा, यांच्या गाड्या बघा आणि लवाजमा बघा आणि त्याच गावात राहणारी लोकं बघा. तर अशी परिस्थिती असते. तर हे लोकं आपल्या सारख्याच समस्या दरवर्षी घेऊन येतात यांच्याकडे येतात आणि इकडे मात्र आमचे पुढारी बक्कळ श्रीमंत दरवर्षी होत जातात आणि राजकारण लोकांना मूर्ख बनवण्यासाठी हे करतात जातीच त्यामुळे वर्षोनुवर्षे अनेको गावा खेड्यातील लोकांची आणि त्यांच्या क्षेत्राची प्रगती आणि विकास हा होत नाही.







