ज्या प्रकारे शहरे आणि तालुके फुगत आहेत त्यावरून आपल्याला कळते की आता ही रस्ते ह्या वेगाने वाढणार्या लोकसंख्ये साठी पुरेशी पडणार नाही. तेव्हा आपल्या कडील रस्त्यांच रुंदीकरण होणे महत्वाच आहे अस वाटून जात किंवा बाकीच्या विकसित देशातील ज्या काही चांगल्या गोष्टी किंवा तंत्रज्ञान ते लोकं आत्मसात करतात आणि तिथल्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाय योजतात ते आपल्याकडे सुद्धा उपयोगात आणले तर लोकांच जीवन आणखी सुखकर आणि तणावमुक्त होऊ शकतं.
सध्याचे शहरांतील आणि तालुक्यातील रस्ते आपण बघितले आणि त्यावर असणारी प्रचंड वाहनांची गर्दी बघितली, जिथे लोकांना दाटीवाटीने आपली वाहणे पुढे...









