जर्मनीचे चांसलर फ्रेडरिक मर्झ हे ह्या दिवसांत भारत दौऱ्यावर आहेत त्यांनी नुकताच गुजरात येथे भेट दिली.
गुजरात मध्ये मकरसंक्रांतीच्या दिवसांत पतंगोंत्सव मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने तेथील लोकं साजरा करतांना दिसतात.
गुजरात मध्ये फ्रेडरिक मर्झ यांनी भारताचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची भेट घेतली.
त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी आणि जर्मनीचे चांसलर फ्रेडरिक मर्झ यांनी महात्मा गांधी यांचा अहमदाबाद स्थित साबरमती आश्रमाला भेट दिली.
साबरमती आश्रमाला भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की साबरमती आश्रम ही महात्मा गांधी यांचा आदर्शांची आठवण म्हणुन आज उभा आहे ज्यामुळे जगभरातील लोकांना सामर्थ्य आणि प्रेरणा देण्याच काम ह्या आश्रमाने केल आहे असं ते या भेटीदरम्यान म्हणाले
फ्रेडरिक मर्झ यांच्या सोबत मोदी यांनी त्यानंतर गुजरात मध्ये सुरू असलेल्या पतंगोत्सवात सुद्धा सहभाग घेतला आणि दोघांनी मिळून उत्साहाने पतंग उडवण्याचा आनंद सुद्धा घेतला.
अहमदाबाद मधील आकाश हे रंग आणि चैतन्याने भरल्याचे या दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. या प्रसंगी चांसलर फ्रेडरिक मर्झ यांना पतंगोंत्सवात घेऊन जाण्यामुळे आनंद झाला असे सुद्धा ते पुढे म्हणाले आणि त्यांना सुद्धा उत्साहाने पतंग उडवण्याचा आनंद घेतांना बघणे हे आनंददायी होते असे ते पुढे म्हणाले.







