महाराष्ट्रा मध्ये झालेल्या २०२४ विधानसभा निवडणुकीत भाजप ने भोंगळ कारभार करून विजय मिळवला आणि अश्या प्रकारचा निकालांची महाराष्ट्रातील जनतेला अपेक्षा नव्हती . असं राहुल गांधी यांनी आपल्या इंडियन एक्सप्रेस मधील लेखात आपलं मत मांडताना आणि भाजप वर आरोप करताना म्हंटल. राहुल गांधी यांच्या त्या आरोपांना प्रत्युत्तर देताना भाजप कडून सुद्धा राहुल गांधींवर प्रश्नाची आणि आरोपांची झोड सोडण्यात आली.
भाजप चे महाराष्ट्रातील नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी, राहुल गांधी यांना प्रति प्रश्न विचारताना म्हंटल कि , राहुल गांधी असे म्हणतात कि महाराष्ट्रात 5 महिन्यांत 39 लाख मतदारांची वाढ हि “संशयास्पद” बाब आहे.
मात्र राहुल गांधी यांनी 2009 ला काय झालं होत ,असा प्रश्न विचारत चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्या बद्दल पुढील माहिती देत ते म्हणाले कि एप्रिल 2009 ला लोकसभा निवडणुकीत
7 कोटी 29 लाख 54 हजार मतदार होते, तर ऑक्टोबर 2009 ला विधानसभा निवडणुकीत 7 कोटी 59 लाख 68 हजार मतदार झाले. तेव्हाही फक्त 5 महिन्यांत 30 लाख मतदार वाढले होते!
त्यावेळी तुमचा निवडणूक आयोगावर विश्वास होता की तेव्हाही
काँग्रेस-आयोग युतीच होती? तेव्हा तुम्ही घोटाळा केला होता का? याच उत्तर चंद्रशेखर बावनकुळें कडून काँग्रेस ला विचारण्यात आला।
चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले कि 2004, 2009 मध्ये जेव्हा काँग्रेस जिंकली तेव्हा काही प्रश्न पडले नाहीत! आज पराभव झाला, आणि महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला झिडकारलं त्यामुळे तुम्ही लोकांनी परत ओरडणे आणि आरोप करणे सुरु केले आहे अश्या प्रकारचा खोचक आणि खरमरीत टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस पक्षाला आणि राहुल गांधी याना मारला.
चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले कि आकड्यांचं अर्धवट वाचन करून आपण देशाला गोंधळात टाकण्याचा निरर्थक प्रयत्न करू नका. स्वतःचं अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा. महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला नाकारलं आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार आहे. त्याच भीतीतून तुम्ही आतापासून पराभवाचं कारण देत आहात.