काही काही पक्षांत या दिवसांत तर लोकं फक्त नि फक्त पैसा कमावण्यासाठी जातात. मग तिकडे तो राजकिय पक्ष हारो की जिंको त्याच्याशी त्यांना काहीही करायच नसते. काहीकाही तर त्याच पक्षात राहून दुसर्या पक्षाचा विजयाबद्दल प्रार्थना करत असतात.
इकडे मात्र त्यांची चमचेगिरी आणि चाटूगिरी प्रामाणिकपणे सुरू असते. इकडून कमाई झाली की मग तिकडे आणि जर का कमाई नाही होत आहे बढ़ती नाही भेटत आहे.
तर मग हे परत ज्या प्रकारे खाजगी क्षेत्रात लोकं दर काही महिन्याने नोकर्या फक्त पगार वाढवा म्हणुन बदलतात त्याच प्रकारे या दिवसांत राजकिय पक्षांमध्ये सुद्धा होताना दिसते. त्यामुळे चमचेगिरी ही फक्त आपली प्रगती करण्यासाठी लोकांची होताना दिसते.
तिकडे तो पक्ष किती खाली घसरत आहे त्याच्याशी त्यांना काहीही करायच नसत. त्यामुळे आज चांगल्या चांगल्या पक्षांची परिस्थिती अत्यन्त वाईट आहे अस लोकांना अनुभवायला मिळते. इकडे पक्षांचे करते धरते टोलेबाजी करतच असतात आणि तिकडे मात्र चमचेच आपली प्रगती व्हावी म्हणुन आपल्या सहकाऱ्यांना खाली ओढत असतात आणि त्यामुळे त्या राजकिय पक्षाच नुकसान होताना दिसत.
आणि जे पूर्वी त्या एका पक्षाबद्दल स्वामीनिष्ठपने बोलताना दिसायचे ते एखाद दुसर्या पक्षात गेल्यावर पूर्वीच्या पक्षावर शाब्दिक हल्ले करताना किंवा त्या पक्षामध्ये ज्या कोणाशी पटत नसेल त्या लोकांवर ताशेरे ओढताना दिसतात आणि तिकडून म्हणजे त्या पक्षाकडून मलाई नियमितपणे आणि पाहिजे तेवढी मिळत नसेल.
तर तिकडे सुद्धा मग त्यांच मन लागत नाही आणि तिकडे सुद्धा मग त्या लोकांसाठी भुंकन हळूहळू ते कमी करून टाकतात आणि आणि तेवढंच काम करतात जेवढी मलाई त्यांना खायला मिळत आहे अणि नंतर मग ते हळूच परत एखादा पक्ष पकडतात तर अश्या प्रकारे या दिवसांत हा पक्ष सोड, तो पक्ष पकड असा कारभार असतो
त्यामुळे आज राजकिय पक्षांची सगळीकडेच परिस्थिती फार वाईट आहे अस चित्र बघायला मिळते आणि याचे परिणाम आम्हाला काहीच महिन्यापुर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणूकीच्या परिणामातुन दिसले. मात्र अश्या प्रकारामुळे लोकांच्या अपेक्षा सगळ्या पाण्यात जातात आणि व्यर्थ जातात.