राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी महायुती सरकारच्या वतीने मांडलेल्या अर्थसंकल्पात नागपूरच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव तरतूद केली आहे. नागपूर जिल्ह्यात हातमाग विणकर आजही मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नागपूर येथे अर्बन हाट केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. त्यामुळे हातमाग विणकरांचे आयुष्य सुखकर होण्यास मदत होईल.नागपूरची मेट्रो आता नागपूरकरांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनली आहे. मेट्रो प्रकल्पाच्या पुढील टप्प्यासाठी देखील प्रोत्साहन या अर्थसंकल्पातून नागपूरच्या जनतेला मिळाले आहे.
प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामटेक नगरीत सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यासाठी विशेष तरतूद या अर्थसंकल्पात केली आहे. यामुळे नागपूर जिल्ह्याच्या सांस्कृतिक वैभवात आणखी भर पडेल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे खाजगी सहभागातून श्रेणीवर्धन व आधुनिकीकरण करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे. यामुळे नागपूरकरांचा व नागपूरला येणाऱ्या प्रवाशांचा विमान प्रवास आणखी सुखकर होईल.यासोबतच, वैनगंगा – नळगंगा या महत्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पास या अर्थसंकल्पात तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. ज्याचा मोठ्या प्रमाणावर लाभ नागपूर जिल्ह्यातील नागरिकांना होणार आहे.
यासह नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे नवीन न्यायालयाची स्थापना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे. अश्या प्रकारचा मत नुकताच मांडल्या गेलेल्या महायुती सरकारचा अर्थसंकल्पाबद्दल , नागपूर जिल्ह्याचे पालक मंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आणि या दरम्यान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थ मंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सुद्धा त्यांनी या दरम्यान आभार मानले.