भाजपने एका दशकात हरियाणाची समृद्धी, तिची स्वप्ने आणि सत्ता हिसकावून घेतली.देशभक्त तरुणांच्या आशा-आकांक्षा अग्निवीरापासून हिरावून घेतल्या गेल्या, बेरोजगारी मुळे कुटंबाचं हास्य हिरावून घेतल्या गेल आणि महागाई मुळे महिलांना आत्मनिर्भर बनण्यापासून वंचित ठेवल.
काळे कायदे आणून शेतकऱ्यांचे हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केला गेला, नंतर नोटाबंदी आणि चुकीच्या GST मुळे लाखो छोट्या व्यापाऱ्यांचा नफा हिसकावून घेतला.आपल्या निवडक ‘मित्रांना’ फायदा व्हावा म्हणून त्यांनी हरियाणाचा स्वाभिमान हिरावून घेतला.मात्र, येणारे काँग्रेस सरकार ‘दशकाच्या वेदनांचा’ चा अंत करेल.
प्रत्येक हरियाणावासीयांच्या आशा, आकांक्षा आणि स्वप्ने पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे.आमचं सरकार येताच, आम्ही हरयाणामध्ये तिथल्या लोकांना २ लाख नोकऱ्या देणार आहोत . हरियाणामध्ये ड्रुग्सच प्रमाण खूप वाढलं आहे तर आम्ही हरियाणाला ड्रुग्स मुक्त करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
त्याचबरोबर, रुग्णांना २५ लाखापर्यंत उपचार मोफत देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे . तेथील महिलांना आम्ही २००० रुपये प्रति महिना देणार आहोत. गॅस सिलेंडर च्या किमती आम्ही ५०० रुपयांवर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत.
३०० युनिट पर्यंत लोकांना मोफत वीज देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. वृद्ध महिलांना , अपंगांना आन विधवांना ६००० रुपये पर्यंत पेन्शन सुद्धा दिल्या जाईल .
शेतकऱ्यांना एमएसपीची हमी, पीक नुकसानभरपाई त्वरित देण्याचा आमचा प्रयत्न असेल ,जेव्हा आमचे सरकार हरियाणात येईल .