आदिवासी हे पृथ्वीवरील सर्वात प्राचीन लोकांपैकी आहेत . आपली ओळख, आपला धर्म, आपली संस्कृती आणि आपल्या प्रार्थना करण्याचे प्रकार हे सुद्धा निसर्गाशी एकरूप झालेले आहेत.
आज काही लोकं आपल्या अस्तित्वाकडे इतर धर्मांच्या चष्म्यातून बघण्याचा प्रयत्न करताना दिसतात . मात्र आम्हा लोकांना आज आपल्या मूळ अस्तित्वाला समजून घेण्याची गरज आहे ;अश्या प्रकारचे मत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी एका कार्यक्रमाप्रसंगी तेथील जनतेसमोर व्यक्त केले .
या दरम्यान ते म्हणाले कि आम्हाला आमचा धर्म आणि जीवनाचे तत्त्वज्ञान हे निसर्गासोबतच्या सहअस्तित्वावर आणि त्याच्याप्रती असलेल्या आदरावर आधारित आहे हे समजणे आवश्यक आहे .
आमचे दैवत हे फक्त मानवी रूपांपुरते मर्यादित नाहीत तर त्यांनीच या विश्वाची निर्मिती केली आहे . पृथ्वी, जंगले, पर्वत, नद्या आणि सर्व सजीव त्या विश्वाचाच एक भाग आहे.
आपल्याला आपल्या ओळखीचा, परंपरेचा आणि निसर्गाशी जोडलेल्या जीवनाच्या तत्त्वज्ञानाचा अभिमान असणे हे आवश्यक आहे; आणि आपण हा वारसा आपल्या भावी पिढ्यांना देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ह्या प्रकारची भावना त्यांनी जनतेसमोर यावेळी व्यक्त केली .







