सहावा अर्थशॉट पुरस्कार सोहळा १७ नोव्हेंबर २०२६ रोजी भारताची आर्थिक राजधानी मुंबई येथे पार पडला. या सोहळ्यासाठी प्रिन्स विल्यम आणि प्रिन्सेस केट मिडलटन यांची मुख्य उपस्थिती होती .
त्याचा एक दिवस आधी त्यांनी मुंबईला भेट दिली होती .व मेट्रो मध्ये प्रवास करण्याचा आनंद घेतला त्याच बरोबर बॅलार्ड इस्टेटमध्ये मुलांसोबत गल्ली क्रिकेट खेळण्याचा आनंद सुद्धा घेतला .
या अर्थशॉट सोहळ्याला अभिनेत्री आलिया भट्ट, सोनम कपूर , डायना पेंटी, श्रेया घोषाल , पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे , महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांची सुद्धा या सोहळ्यास उपस्थिती होती .
जागतिक अर्थशॉट पुरस्कार हा ब्रिटनचे प्रिन्स विल्यम यांनी सुरू केलेला जगातील सर्वात प्रतिष्ठित पर्यावरण पुरस्कार आहे ; अर्थशॉट पुरस्कार चे काही पुरस्काराचे होते त्यामध्ये निसर्गाचे आणि पर्यावरणाचे पुनर्जीवन कशा प्रकारे करता येईल .
वायुप्रदूषणाला कशा प्रकारे आळा घालता येईल आणि कशा प्रकारे ते नियंत्रणात आणता येईल . समुद्रातील प्रदूषण कशा प्रकारे रोखता येईल .
कचरा मुक्त जग कशा प्रकारे ठेवता येईल या वर आधारित या पुरस्काराची निकष होते .
तर यावेळी ९ ते १७ वयोगटातील तरुण पर्यावरण संशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘चिल्ड्रन्स अर्थशॉट’ आयोजित करण्यात आला होता हे विशेष .







