सुट्या खाद्य तेलाचा विक्रीसाठी एक वर्षाची मुदत वाढ देण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कडून देण्यात आले होते;
याची अंमलबजावणी करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा उपस्थितीत;
जोपर्यंत सुट्या खाद्य तेलाचा विक्रीसाठी कार्यपद्धती निश्चित होत नाही तोपर्यंत एक वर्षाची सूट कायम ठेवण्यात यावी असा निर्णय घेण्यात आला .
दिवाळीच्या निम्मित घेतलेल्या या निर्णयामुळे पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे असं सुद्धा या दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांचा कडून स्पष्ट करण्यात आलं .
खाद्यतेलातील भेसळ रोखण्यासोबतच ग्राहकांची सुरक्षितता आणि छोट्या व्यापाऱ्यांच्या उपजीविकेचा समतोल राखण्यावर शासनाचा भर असल्याचे या वेळी ते म्हणाले .






