महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वप्रवासाला १२ वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्त राज्यसभेचे खासदार आणि विधितज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी त्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या .
यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा करताना म्हंटल कि जा वेळी त्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद स्वीकारले तेव्हा पासून सातत्याने त्यांनी महाराष्ट्राचा प्रगतीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे .
सत्तेत असताना विकासाला गती देणे असो किंवा विरोधी पक्षात असताना जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे असो, त्यांनी प्रत्येक भूमिकेत आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे .
त्यांचा कडून नेहमीच पदापेक्षा कर्तव्याला, घोषणांपेक्षा कृतीला आणि राजकारणापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाला प्राधान्य देणायचा प्रयत्न हा होत राहिला आहे अशा प्रकारचा भावना या वेळी खासदार उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले .







