सर्वसामान्य जनता आपल्या क्षेत्रातील पुढारी आपल्या क्षेत्रात येण्याची वाट बघत असतात.
त्यांनी लोकांचा समस्या ऐकाव्यात, त्यांनी आमचा क्षेत्राची पाहणी करावी ;
रस्त्यांची काय परिस्थिती आहे, शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे, छोट्या व्यापाऱ्यांच्या काय समस्या आहेत; त्यांचा भागातील तरुणांच्या काय समस्या आहेत; महिलांच्या काय समस्या आहेत; शाळा आणि महाविद्यालयांची काय अवस्था आहे?
मात्र असं बघायला मिळत कि, ते नेते कित्येक महिन्यांपासून आपल्या मतदारसंघात भटकलेच नाहीत आणि कित्येक महिन्यांपासून ते गायब आहेत .त्यांनी आपल्या मतदारसंघातील लोकांच्या समस्या समजून घेण्याचा किंवा जाणून घेण्याचा प्रयत्नच केलेला नाही;
मात्र, या मध्ये चूक हि कुणाची असते? त्या नेत्यांची का, कि ज्यांना आपल्या मधलीच, लोकं मुद्दाम निवडून देण्यास अप्रत्यक्षपणे सहकार्य करतात , मात्र त्यातले काही निवडणूक झाल्यानंतर आणि निवडून आल्यानंतर कधीच तिकडे आपल्या मतदारसंघातील लोकांच्या समस्या समजून घ्यायला भटकत नाहीत .
मात्र , याऐवजी या नेत्यांची भटकंती हि सर्वीकडे होत असते आणि नियमितपणे त्यांचा परदेशातसुद्धा वाऱ्या होत असतात तर अश्या सुद्धा पुढाऱ्यांची काही आपल्या कडे कमतरता नसते .
मात्र, या लोकांना आपल्या भागातील समस्या समजून घ्यायला या दरम्यान वेळ मिळत नाही, आणि अशाप्रकारे दिवस आणि वर्षे हळहळू निघून जातात, आणि त्या भागातील समस्या तशाच राहतात;
त्यामुळे त्यांचा संपूर्ण कार्यकाळ निघून गेला तरी ना त्या प्रदेशाचा विकास होत, ना त्यांचा लोकांच्या जीवनात कोणतेही सकारात्मक बदल या काळात बघायला मिळत;
आणि त्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये अश्या प्रकारे समस्या हि वर्षोनुवर्षे लोकांना अनुभवायला मिळते. त्यामुळे चांगला बदल आपल्या समाजात हवा असेल तर नक्कीच आपलं मत हे मोठ्या समजूतदारीने योग्य त्या उमेदवाराला पडायला हवं जो , आपल्या क्षेत्रात काम करू शकतॊ ;
आपल्या क्षेत्रातील लोकांचा आणि समस्या समजून घेण्यासाठी तिथे असतो आणि आपल्या क्षेत्रात सकारात्मक बदल हे आणू शकतो .







