हे देखील सत्य आहे! आजही अनेक भागांमध्ये लोक चुलीवर स्वयंपाक बनवण्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करतात. आजही प्रत्येकाला स्वयंपाकाचा गॅस जोडणी (connection) आणि सिलिंडर्स विकत घेणे परवडत नाही.
कारण देशातील अनेक ग्रामीण भागांत लोकांसाठी स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडर्सच्या किमती ह्या परवडण्यासारख्या नसतात. त्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये मोठ्या संख्येने लोकं शेणाच्या गोवऱ्या वापरून अन्न शिजवताना दिसून येतात. आणि अशा प्रकारे ते आपला घरसंसार चालवतात. आजही देशाच्या अनेक ग्रामीण भागांमध्ये, चुलीवर शिजवलेले अन्न खाणे लोकांना आवडते. जेव्हा गॅस सिलिंडर्सच्या किमती वेगाने वाढत आहेत आणि ज्या प्रदेशातील लोकांना गॅस सिलिंडर्स विकत घेणे परवडत नाही, तर ते लोकं शेणाच्या गोवऱ्या वापरून चुलीवरच अन्न शिजवतात; आणि अशा प्रकारे ते सहजपणे आपल्या पैशांची बचत करू शकतात आणि आपलं घर हे चालवू शकतात.
मात्र शहरांमध्ये हे चित्र खूप कमी बघायला मिळते ; कारण चूल मांडण्यासाठी आवश्यक असलेली जागा शहरांमध्ये तिथे सहसा उपलब्ध नसते. शिवाय, चुलीतून निघणारा धूर ही आणखी एक समस्या असते; जर आजूबाजूला पुरेशी मोकळी जागा नसेल, तर या धुरामुळे अधिक त्रास होतो.
तसेच, स्वयंपाकाच्या गॅसची सहज उपलब्धता असल्यामुळे आणि लोकांना तिथे स्वयंपाकाचा गॅस विकत घेणे परवडत असल्यामुळे ते स्वयंपाकाचा गॅस विकत घेणे पसंद करतात आणि अन्न लवकर त्यावर शिजत असल्यामुळे लोकांना ते अधिक योग्य वाटते आणि जेवण सहज आणि पटकन तयार होत असल्यामुळे ते अधिक त्यांना सोयीस्कर वाटते .
तरीही, भारताच्या अनेक ग्रामीण भागांमध्ये परिस्थिती अजूनही बदललेली नाही; तिथे लोकं आजही अन्न शिजवण्यासाठी चुली आणि शेणाच्या गोवऱ्यांचाच वापर करतात. मुख्यतः, आता तर या दिवसांत ‘ऑनलाइन’ विक्री करणाऱ्या प्लॅटफॉर्म्सवर सुद्धा शेणाच्या गौर्या ह्या उपलब्ध असतात आणि त्यांची किंमत साधारणपणे १५० रुपये प्रति किलो (किंवा त्यापेक्षा थोडी अधिक) असते मात्र वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स वर ह्या दरात चढउतार बघायला मिळते . अनेक लोकं त्या विकतही घेतात; कारण त्यांना चुलीवर अन्न शिजवणे आवडते आणि या गोवऱ्यांचा वापर इतर कामांसाठीही केला जातो या दिवसांत आणि पूर्वी सुद्द्धा त्याचा उपयोग वेगवेळ्या उद्देशासाठी केला जायचा .
तर, एका बाजूला काही भागांमध्ये लोकांना स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर्स मिळविण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो तर दुसऱ्या बाजूला लोकं अश्या प्रकारचे आणि सुंदर मार्ग शोधताना दिसतात, ज्यांच्या मदतीने ते पैशांची बचत करू शकतात आणि सहजपणे आपले अन्नही शिजवू शकतील.
हे चित्र नेमके तीच बाब दर्शवते. मात्र, आजकाल आपण बघतो कि अनेक भागांमध्ये लोकं आपली जनावरे गमावत असल्याचे चित्र दिसत आणि कुरणांची (चराऊ जमिनींची) झपाट्याने होणारी घट पाहता, भविष्यात कदाचित लोकांना गवताळ प्रदेश आणि पाळीव प्राणी हे दिसतील कि नाही हा सुद्धा प्रश्न असेल. आणि यामुळेच, त्यांना शेणाच्या गोवऱ्या येणाऱ्या काळात मिळतील कि नाही हा सुद्धा प्रश्न असेल ; त्याचबरोबर, चुलीवर शिजवलेले अन्न ज्यांना मनापासून आवडते त्यांना त्या प्रकारचं अन्न चाखायला मिळणार नाही.
कारण येणाऱ्या काळात गवताळ प्रदेश हे नष्ट होण्याचा वेग कदाचित अधिक असेल त्याचबरोबर गवताळ प्रदेश नष्ट झाल्यामुळे पाळीव प्राणी सुद्धा आपल्याला बघायला मिळणार नाहीत . अश्या प्रकारची परिस्थिती पुढे भविष्यात कदाचित असेल .







