गेले जवळपास दोन महिने महाराष्ट्रात पहिली इयत्तेपासून हिंदी भाषा शिकवणे यावरून सरकारकडून प्रचंड गोंधळ घालणं सुरु आहे. सुरुवातीला पहिल्या इयत्तेपासून तीन भाषा विद्यार्थ्यांना शिकवणार आणि त्यात हिंदी भाषा ही तिसरी सक्तीची भाषा असेल असं राज्य सरकारकडून आणि शिक्षण मंत्रालयाकडून घोषित केलं गेलं असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे याना आपल्या सोशल मीडिया हॅन्डल वरून प्रश्न विचारताना म्हणाले.
ते पुढे म्हणाले कि तिसऱ्या भाषेच्या मुद्द्या बद्दल मी आणि मनसे कडून राज्य सरकारला जाब विचारण्यात आला होता आणि जनभावना सुद्धा तयार झाली होती . ती जनभावना इतकी तीव्र होती की सरकारने तिसऱ्या भाषेसाठी हिंदी भाषेची सक्ती केली जाणार नाही असं घोषित केलं.होत असं सुद्धा राज ठाकरे म्हणले. ते पुढे म्हणाले कि हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही, देशातील इतर प्रांतातील भाषांसारखी एक भाषा. ती शिकण्याची सक्ती मुलांवर का केली जात होती ? कुठल्यातरी दबावाखाली सरकार घरंगळत का जात होतं हे माहित नाही.
पण मुळात पहिल्या इयत्तेपासून तीन भाषा मुलांना का शिकायला लावायच्या हा मुद्दा आहेच. मग त्याबाबत पण आपण घोषणा केलीत की महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील. पण या घोषणेचा लेखी अध्यादेश अजून का आला नाही ? या बद्दल राज ठाकरे यांनी राज्य सरकारला आणि शिक्षण मंत्रालयाला विचारणा केली.
पुढे ते म्हणले कि देशातील अनेक राज्यांनी इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा आणि हिंदीची सक्ती झुगारून दिली, याला कारण त्या त्या राज्यांची भाषिक अस्मिता. पुढे ते मंत्री दादा भुसे याना म्हणाले कि आपण आपले सहकारी मंत्रिमंडळ हे देखील जन्माने मराठी आहात , आपण इतर राज्यातील हिंदीला विरोध करणाऱ्या शासनकर्त्यां सारखे कधी वागणार आणि आपल्या भाषेची अस्मिता कधी आणि कशी जोपासणार ? त्या इतर राज्यांसारखी तीव्र अस्मिता सरकार पण दाखवेल अशी अपेक्षा. असं राज ठाकरे मंत्री दादा भुसे यांना विचारणा करताना म्हणाले.
शिक्षण विभागाने इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील ( मराठी आणि इंग्रजी ) या निर्णयाचा लेखी आदेश लवकरात लवकर जारी करावा. असं राज ठाकरे पुढे म्हणाले.