गावात सगळे भिकारी, गरीब, नागडे, कपड़े त्या लोकांचे कपडे मळलेले, फाटलेले दिसत असतिल. दररोज ते रस्त्याचा बाजूला भीक मागतांना दिसत असतिल.आरोग्य व्यवस्था जिथे पार मोडकळीस गेली असेल.
लहान मुलांना आणि बायकांना खायला अन्न नसेल, घालायला चपला नसेल. गरिबांवर , स्त्रियांवर आणि शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल.
युवक मोठ्या प्रमाणात अशिक्षित राहत असतिल आणि लोकांना गावात कामधंदा नसेल. शेतकर्यांचे हाल बेहाल असेल.
लोक बिड्या फुंकन्यात, तंबाखू खाण्यात, चरस , गांजा फुकन्यात. जुगार खेळण्यात आणि रंडीबाजी मध्ये प्रचंड बुडालेले असेल, रंडीखाण्यांचा सुळसुळाट सगळीकडे असेल.
त्यामुळे युवा पिढी नादी लागली असेल आणि उध्वस्त होत असेल, दारूच प्रचंड व्यसन तिथल्या लोकांमधे लागलेले असेल त्यामुळे अनेक स्त्रियांचा संसाराची राखरांगोळी होत असेल.
तर या सगळ्या परिणामांना कोण जबाबदार असतो?
गावातील प्रशासन आणि गावाचे पुढारी ज्यांच्या हातात गावाला सुधारण्याच आणि गावाची प्रगती करण्याच काम असत.