भारताचे उप राष्ट्रपती सी .पी. राधाकृष्ण हे दोन दिवसीय महाराष्ष्ट्र दौऱ्यावर आहेत .
काल त्यांचं नागपूर येथील विमानतळावर आगमन झालं , या दरम्यान त्यांच्या स्वागतासाठी , महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थिती होते .
त्यानंतर त्यांनी नागपूर स्थित व्यास सभागृहाला भेट दिली तिथे भारतीय युवा संसदच्या राष्ट्रीय अधिवेशनाला त्यांनी उपस्थिती दर्शविली .
उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण हे संघाचे सुद्धा कार्यकर्ते आहेत आणि अनेक वर्षे त्यांनी यापूर्वी संघाचे कार्यकर्ते म्हणून काम केलं आहे . तर त्यांची या निमित्ताने नागपूर स्थित रेशीमबाग येथील संघ कार्यालयाला सुद्धा भेट झाली .







