भाजपाचा कमळ या दिवसांत सगळी कडे फुलायला लागल आहे असं चित्र बघायला मिळत आहे .
महापालिका निवडणुकीमध्ये भाजपाची कामगिरी जोरदार होतांना बघायला मिळाली. मुंबई सारख्या शहरातून शेवटी ठाकरे बंधूंची पिछाडी होतांना काल बघायला मिळाली. शिवसेना उद्धव ठाकरे गटाला तिथे ६५ जागा मिळाल्या.
तर शिवसेना शिंदे गटाला अवघ्या २८ जागा मिळाल्या तर कॉँग्रेस ला तिथे २४ जागा मिळाल्या.
आणि भाजपा हा तिथे जिंकणारा सर्वात मोठा पक्ष आहे अस बघायला मिळाल. भाजपला तिथे ८९ जागा मिळाल्याचे चित्र बघायला मिळाल.
त्याच बरोबर मनसेला तिथे यश मिळवता आल नाही हे आपल्याला बघायला मिळाल तिथे मनसेला अवघ्या ६ जागेवर समाधान मानावं लागल.
राष्ट्रवादी शरद पवार गट तिथे केवळ १ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला तिथे ३ जागा मिळवित्या आल्या
एमआयएम या पक्षाला तिथे ८ जागा मात्र मिळविण्यात यश मिळाल. इकडे पुण्यासारख्या ठिकाणी मात्र भाजपा ने सरशी केली आणि शिवसेना शिंदे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाची अवस्था या महापालिकामध्ये वाईट केली. भाजपला तिथे 119 जागा मिळतानाचे चित्र बघायला मिळाल त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला तिथे २७ जागा मिळाल्याचं चित्र होत .
बाकी शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि अजित पवार यांचे पक्ष अनेक ठिकाणी मागे पडत असतानाचे चित्र निकालाच्या दिवशी बघायला मिळालं .
पुणे, पिंपरी चिंचवड, इथे सुद्धा भाजपाने बर्यापैकी आपल वर्चस्व निर्माण केल. मुंबई, ठाणे , कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, वसई – विरार, उल्हासनगर, मीरा – भाईन्दर, पनवेल, पुणे. सांगली, मिरज, सोलापूर, इचलकरंजी, नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, जालना, नांदेड, वाघाळा, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, अकोला, अमरावती या शहरांत भाजपचा वर्चस्व राहील.
या महापालिका निवडुकीत भाजप पक्षाने जमिनीवर दररोज परिश्रम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा बळावर हे यश खेचून आणलं कि या निवडणुकीतसुद्धा प्रचंड पैसे ओतून भाजपने विजय खेचून आणला हा प्रश्न मात्र सामान्य माणसाला नक्कीच पडला असेल आणि परत त्यांना ईव्हीएम मशीनमध्ये कदाचित दोष तर नाही ना हा प्रश्न पडला असेल त्याचसोबत अनेक मतदान केंद्रावर असं सुद्धा निदर्शनास आलं कि मार्करने या वेळी बोटांवर शाई लावल्या जात होत्या आणि ती शाई सहज काही प्रयत्नानंतर काही वेळांत निघत होती हे सुद्धा बघायला मिळालं त्यामुळे कित्येकांनी ओरडणे सुरु केले होते.
त्याचबरोबर , दुसऱ्या बाजूला बघायला मिळालं कि, प्रादेशिक पक्षांची अवस्था दयनीय होताना दिसली. काँग्रेस ची अवस्था स्थानिक पातळीवर सुद्धा हळहळू वाईट होत चालली आहे हे या निवडणुकीतून बघायला मिळाल. मनसे सारख्या पक्षाने , उद्धव ठाकरे यांचा शिवसेनेसोबत युती केली मात्र त्याचा फायदा मनसे ला होताना दिसला नाही त्याऐवजी त्याचा फायदा उद्धव ठाकरेंचा शिवसेनेला झाला असं अनुभवयास आलं.
भाजपने आपलं वर्चस्व मागील विधासभेचा निवडुकीत सुद्धा सिद्ध केलं होत , त्या नंतर नागरपंचायतांच्या निवडणुकीत सुद्धा भाजपने आपलं वर्चस्व सिद्ध केलं आणि महापालिकांचा निवडुकानुकांमध्ये सुद्धा या पक्षाची कामगिरी जोरदार राहिली। त्यामुळे बाकीचे पक्ष हे साहजिकच बॅकफूट वर आलेले आपल्याला बघायला मिळालं. लोकांची आता ह्या पक्षाकडून फक्त विकासाची अपेक्षा आहे. असं समजण्यात काहीही वाईट नाही . त्याच सोबत वंचित बहुजन आघाडी चा म्हणावा तेवढा प्रभाव यंदा सुद्धा बघायला मिळाला नाही.







