भारतातील महाराष्ट्र या राज्यातील महाड गावात डॉटर बाबासेहब आंबेडकर यांनी चवदार तळ्याच्आंदोलन २० मार्च १९२७ या दिवशी आपल्या सहकाऱ्यांसोबत केलं होत.
दिन दलितांच्या समस्या त्या काळात अधिक होत्या , पिण्याचा पाण्यासाठी सुद्धा लोकांना वाईट वागणूक वेगवेळ्या भागात लोकांच्या वाट्याला येत असायची आणि हि परिस्थिती अनेको पिढ्यांपासून चालत येत होती . याची जाणीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होती.
त्या दलितांचे हाल आणि वेदना याची जाणीव त्यांना होती . त्यांनी महाराष्ट्रातील कोंकण भागातील महाड या गावात पिण्याचा पाण्यासाठी आंदोलन उभारलं जेणेकरून समाजातील बाकीच्या सर्व लोकांसारखं त्या लोकांनासुद्धा माणसांसारखा सामान्यपणे जगण्याचा अधिकार मिळावा .
तर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा आपल्या भावना महाड येथील चवदार तळ्याचा बाबासाहेब आंबेकर यांचा या दिवशी केलेल्या सत्याग्रहाचा आठवणीनिमत्त मांडल्या .
ते म्हणाले कि बाबासाहेब आंबेकरांनी केलेला सत्याग्रह हा फक्त पाण्यासाठी नव्हता तर समाजातील अनेको पीडित आणि दलित लोकांना माणूस म्हणून जगण्यासाठी होता . ते म्हणाले कि हा लढा समाजातील असमानता , विषमता , अस्पृश्यता आणि अन्यायाविरुद्ध चा होता.
त्या वेळी पाण्याचा हा प्रश्न हे फक्त निम्मित होत. कारण मूळ प्रश्न हा मानवी हक्कांचा होता आणि त्या अनेको लोकांच्या स्वाभिमानाचा होता अश्या प्रकारचा भावना त्यांनी बाबासाहेबांनी केलेल्या चवदार तळ्याचा सत्याग्रहाचा दीना निम्मित व्यक्त केल्या .
ह्या वेळी ते म्हणाले कि चवदार तळ्याच्या पाण्याचा घोट घेताना बहिष्कृत समाजाने केवळ तहान भागवली नाही, तर शतकानुशतके चालत आलेल्या अन्यायाला ठामपणे आव्हान सुद्धा दिले. हा क्षण भारतीय समाजव्यवस्थेत समतेच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरला असे ते म्हणाले .
त्यामुळे आपल्याला या प्रकारचा महान संघर्षातून प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे , त्याचबरोबर समता, बंधुता आणि न्यायाचा मूल्यांसाठी लढण्याचा संकल्प करण्याची सुद्धा लोकांना गरज आहे; अश्या प्रकारचा भावना त्यांनी व्यक्त केल्या आणि चवदार तळे सत्याग्रहातील सर्व सहभागी योद्ध्यांसह महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना, त्यांनी अभिवादन केलं !







