बाहुबली आणि RRR या धडाकेबाज चित्रपटांचे दिगदर्शक एस एस राजामौली यांनी धरुंधर द रिव्हेंज या चित्रपटाची बरीच प्रशंसा केली आहे .
त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर धुरंधर १ आणि धुरंधर द रिव्हेंज या आलेल्या भागाची प्रशंसा करताना म्हंटल कि मला धुरंधर १ सुद्धा आवडला होता ; मात्र धुरंधर द रिव्हेंज ने भव्यता आणि भावनिकता या दोन्ही बाबतीत पहिल्या चित्रपटाला बरेच मागे टाकले आहे.
लेखन, कलाकारांची निवड , तंत्रज्ञानातील संतुलन , संगीत, त्याचबरोबर चित्रपटातील जगाची रचना सोबतच दिग्दर्शन सुद्धा अतिशय सुंदर रित्या निभावण्यात आलं होत अश्या प्रकारच्या भावना राजामौली यांनी मांडल्या .
मात्र त्यातील भावनिक गुंतागुंत खऱ्या अर्थाने चित्रपटाला वास्तवाजवळ नेणार होत असं दिग्दर्शक एस एस राजामौली म्हणाले.
लेखकाने कथेमध्ये अश्या प्रकारचे वळण गुंफले आहेत कि त्यामुळे ते अधिक भावनिक आणि खरे वाटतात त्यामुळे चित्रपट बघताना खरंच तणाव निर्माण होतो .
दिगदर्शक आदित्य धर यांनी बरच सुंदर काम केलं आहे; शेवट पर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी बरेच परिश्रम करावं लागत असं सुद्धा राजामौली म्हणाले.
त्याचबरोबर रणवीर सिंगचा अभिनय सुद्धा अतिशय सुंदर आणि जबरदस्त होता ह्या शब्दात त्यांनी रणवीर सिंग ची प्रशंसा केली .
शेडमधील बहिणीसोबतचा प्रसंग म्हणजे अभिनयाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. त्याचबरोबर सुरुवातीपासून ते हृदयद्रावक क्लायमॅक्सपर्यंत, रणवीर सिंग ने हमजा आणि जस्कीरत या दोन्ही भूमिकेमध्ये प्रेक्षकांचं प्रचंड मनोरंजन केलं , ह्या प्रकारचा प्रतिक्रिया ह्या दिग्दर्शक राजामौली यांच्या कडून आल्या .
आर . माधवन, यांनी एका राष्ट्राची हतबलता आणि निराशा बऱ्याच उत्तमरीत्या मांडली आहे, त्यामुळे त्यातील तुमचे यश हे आमचेच वाटते .
शेवटी धुरंधर द रिव्हेंज च्या यशाबद्दल संपूर्ण टीमचे दिग्दर्शक एस एस राजौमौली यांनी अभिनंद केले.







