दिल्ली येथील भारत मंडंपम येथे १६ ते २० फेब्रुवारी २०२६ दरम्यान पार पडलेल्या AI इम्पॅक्ट परिषदेमध्ये जगातील अनेक देशांच्या नेत्यांनी, तंत्रज्ञान जगातील तंत्रज्ञान प्रेमींनी, व्यापारी आणि संशोधकांनी हजेरी लावली. या AI इम्पॅक्ट समिट ची थीम हि (सर्वजण हिताय सर्वजण सुखाय अशी होती.)
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेचं उदघाटन केलं व या दरम्यान त्यांचं भाषण झालं या भाषणा दरम्यान त्यांनी व्यापार ,व्यसायातील प्रतिनिधींच, तंत्रज्ञान प्रेमींचं, संशोधकांचं , राजकारण्यांचं आणि धोरणकर्त्यांचं स्वागत केलं.
या दरम्यान ते म्हणाले कि AI मुळे येणाऱ्या काळात जगात अनेक चांगले बदल बघायला मिळतील. आरोग्य क्षेत्रात, कृषीच्या क्षेत्रात, शिक्षणाच्या क्षेत्रात, संशोधनाच्या क्षेत्रात, तंत्रज्ञानाचा क्षेत्रात अनेक चांगले आणि मोठे बदल लोकांना बघायला मिळतील . दिल्ली येथील भारत मंडपम येथे पार पडलेल्या AI इम्पॅक्ट परिषदेमध्ये जगातील वेगवेगळ्या देशाच्या नेत्यांनी सुद्धा हजेरी लावली होती हे बघायला मिळालं .
त्यामध्ये फ्रान्स चे पंतप्रधान इमानुएल मॅक्रोन यांची सुद्धा उपस्थिती होती.
त्याच बरोबर श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसेनायके यांनी सुद्धा या परिषदेला भेट दिली . त्याच बरोबर ब्राझील चे राष्ट्राध्यक्ष लुला दि सिल्वा यांनी सुद्धा या परिषदेला हजेरी लावली होती. भूतान चे पंतप्रधान तेशेरिंग तोबगे. मौरिशस चे पंतप्रधान नवीन चंद्र रामगुलाम.
बोलिव्हियाचे उपाधयक्ष एडमंड लारा मॉन्टेनो, क्रोएशियाचे पंतप्रधान श्री आंद्रेज प्लेन्कोविच, एस्टोनियाचे अध्यक्ष अलार करिस. फिनलंडचे पंतप्रधान मिस्टर पेटेरी. ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस.गयानाचे उपाध्यक्ष भरत जगदेव. कझाकिस्तानचे पंतप्रधान ओल्झास बेकटेनोव्ह
सर्बियाचे अध्य्क्ष अलेक्झांडर वुसिक.स्लोव्हाकियाचे अध्यक्ष पीटर पेलेग्रीनी
स्पेनचे अध्यक्ष पेड्रो सांचेझ पेरेझ-कास्टेजन. सेशेल्सचे उपाध्यक्ष सेबॅस्टिन पिल्ले. स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गाय परमेलिन. नेदरलँड्सचे पंतप्रधान डिक शूफ
युएईचे शेख खालेद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान, अबू धाबीचे क्राउन प्रिन्स यांनी सुद्धा या AI इम्पॅक्ट परिषदेला हजेरी लावली होती .
त्याचबरोबर भारतीय नेत्यांची सुद्धा तिथे उपस्थिती ही अनुभवायला मिळाली. महाराष्ट्रातून महाराष्ट्र राज्यचे मूंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी सुद्धा इथे आपली हजेरी लावल्याचं अनुभवायास आलं . .
त्याच बरोबर अनेक तंत्रज्ञानप्रेमी, तंत्रज्ञान जगातील विविध क्षेत्रातील त्यांचे प्रतिनिधी आणि व्यावसायिक भारत मंडपम येथे सुरु असलेल्या AI इम्पॅक्ट परिषदेला भेटी दिल्या .







