तलावातील बेडकं आपल्या तलावातील बाकीच्या बेडूक शेजाऱ्यांना सहज ओळखतात.
कारण दररोज त्यांच त्याच तलावात उड्या मारणे सुरू असते, कधी इकडे तर कधी तिकडे.
मग तिकडे तलावाच्या अवती भवती आणखी कोणते प्राणी येतात यांची सुद्धा त्यांना कल्पना असते.
कोणत्या जंगलातून माकडं येतात. कोणत्या जंगलातून कोल्हे येतात. तर कोणत्या जंगलातून लांडगे येतात याची सुद्धा त्यांना बर्यापैकी जान असते.
कोणत्या गावावरून कोणते पक्षी येतात याचीही त्यांना चांगल्या प्रकारे जाण झालेली असते. पावसाळ्याचे दिवस त्यांच्या साठी खास असतात. कारण संपूर्ण वर्ष भर जेवढ्या उड्या त्यांना मारायला मिळत नाही तेवढ्या उड्या ते पावसाळ्याचा दिवसांत आनंदाने आणि उत्साहाने मारतात.
मुसळधार पावसात किंवा सतत पाऊस सुरू असेल तर त्यांचा समूहाने ओरडण्याचा आवाज खास सुरेल असतो. एखाद सुमधूर संगीत त्यादरम्यान सुरू आहे अश्या प्रकारचा भास त्या दरम्यान होतो.
तर या दिवसांत त्यांची मजा असते. मिळून ते सोबत उड्या मारतात आणि मिळूनच ते ओरडतात.
मासोळी पकडण्यासाठी पक्षी आले तर त्यांची मात्र फजिती होतांना दिसते. सगळे धडाधड पाण्यात उड्या मारतांना आणि पाण्यात गायब होतांना दिसतात. रंग या बेडकांचा वेगवेगळा असतो.
कधी पांढरे बेडकं दिसतात. कधी पिवळे बेडकं दिसतात, कधी हिरवे सुद्धा बेडकं दिसतात आणि काळे सुद्धा बेडकं दिसतात. म्हणजे निसर्गाने रंगाच्या बाबतीत यांच्यासोबत कोणताही भेदभाव केलेला नाही ह्यातून आपल्याला कळत.







