मग ते कोणीही का ना असोत. गरीब असो, आदिवासी असोत, दलित असोत, शेतकरी यांना आज आपली परिस्थिती समजणे आवश्यक आहे. खाली जमिनीवर आणि अनेको गावा, खेड्यात यांची परिस्थिती अतिशय चिंताजनक असते. त्यांना शिक्षणा सोबतच आपल्या सामजिक परिस्थिती मध्ये बदल घडवण्यासाठी परिश्रम करणे आज आवश्य आहे .
राजकारण्यांच काम आहे आपल्या राजकिय फायद्यासाठी ते लोकांचा फायदा घेतात आणि त्यानंतर ते या लोकांना विसरून जातात आणि यांची प्रश्ण मात्र सुटत नाहीत आणि राजकारण्यांकडून सुद्धा कित्येकदा मुद्दाम यांची प्रश्ण सोडवण्याचा प्रयत्न त्यानंतर होत नाही.
त्यामुळे वर्षों न वर्षे यांच्या परिस्थितिमध्ये बदल होत नाही आणि लोकंच आहेत सगळे आणि सगळीकडे जिकडे बघितले तिकडे, त्यांच्या मध्ये भेदभाव होताना दिसतो आणि महत्वाच म्हणजे आज अनेको गाव खेड्यात या लोकांची परिस्थिती गंभीर असते. मात्र त्यांच्या समस्यांकडे विचारपूर्वक दुर्लक्ष केल्या जाते. मुळात सगळ्यांना सोबत घेऊन चालणे आणि जे लोकं समाजात ज्या काही कारणामुळे मागे राहून गेले. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न पूर्वक सोबत घेऊन आणि अधिकाधिक संधी त्यांच्या प्रगतीसाठी निर्माण करून त्याचप्रकारे समाजाची प्रगती साधता येऊ शकते.
निवडणुका झाल्यानंतर आणि निवडणुकांचे परिणाम आल्यानंतर अनेक पुढाऱ्यांचे वागणे अगदी बदलले दिसतात. तुम्ही कोण आणि आम्ही कोण? कोणते तुमचे प्रश्ण आणि कोणत्या तुमच्या समस्या सगळे ते विसरलेले असतात. आणि कित्येक वर्षे या विशिष्ट वर्गातील, किंवा समाजातील अनेक लोकांना आणि शेतकर्यांचा विकास किंवा प्रगती खुंटल्याचे चिन्हे आम्हाला दिसतात. त्यामुळे लोकानी सुद्धा ही बाब समजावी आणि आपल्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे तेवढच आवश्यक आहे.