जम्मू काश्मीर मध्ये निवडणुकीचे वारे वाहत आहेत याच निमित्ताने,राहुल गांधी यांनी जम्मू काश्मीर मध्ये भेट दिली व तिथल्या सामान्य जनतेशी संवाद साधला त्या दरम्यान त्यांनी सरकार वर जोरदार ताशेरे ओढताना म्हणले कि काश्मीर मध्ये मोदीजींच्या मक्तेदारी मॉडेल ने गोरगरिबांच्या आणि युवकांच्या नोकऱ्या काढून घेतल्या आहेत.
एमसएमई उध्वस्त केल्या आहे आणि लोकांना संधीपासून वंचित ठेवले आहे . खराब जीएसटी आणि नोटबंदी सारख्या अक्षम्य धोरणांमुळे लघु आणि मध्यम उद्योगांवर पद्धतशीर आक्रमणामुळे भारताला उत्पादक अर्थव्यस्थे पासून उपभोग्य अर्थव्यस्थेकडे वळवले आहे.
या वेगाने आपण चीनशी स्पर्धा करू शकत नाही किंवा सर्व भारतीयांसाठी समृद्धी सुनिश्चित करू शकत नाह। भारताची क्षमता कितीतरी अधिक आहे व्यापक संधी आणि रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आपण जीएसटी सुलभ केला पाहिजे आणि लहान व्यवसायांसाठी बँकिंग प्रणाली खुली केली पाहिजे . जेणेकरून लोकांना आपले छोटे मोठे व्यवसाय चालवण्यासाठी त्रास सहन करावा लागणार नाही .