केरळच्या वायनाड मधून खासदारकी साठी मैदानात उतरलेल्या प्रियांका गांधी यांनी आज संसदेत खासदारकीची शपथ घेतली त्यावेळी त्या म्हणाल्या आपली राज्यघटना ही लोकांच्या हक्कांचे संरक्षण करणारी ढाल आहे. त्याचे रक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आम्ही आमचे कर्तव्य पूर्ण निष्ठेने पार पाडू.
आमच्या राज्यघटनेने, लोकशाहीने आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वायनाडच्या जनतेने आमच्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत.
लोकसभेच्या निवडणुकीत राहुल गांधी वायनाड आणि रायबरेली मधून मैदानात उतरले होते आणि ते वायनाड आणि रायबरेली या दोन्ही जागांवरून जिंकले सुद्धा होते आणि त्यामुळे त्यांना कोणत्याही एका जागेची निवड करायची होती तर त्यांनी , यावेळी रायबरेलीचा खासदार म्हणून संसदेत जाण्याचं ठरवलं आणि त्यामुळे वायनाड ची जागा त्यांनी सोडली होती ,तर ती जागा खाली झाल्यामुळे, प्रियांका गांधीने तिथून लढण्याचा निर्णय घेतला आणि या वेळी मैदानात सुद्धा उतरल्या .
त्यांनी या प्रचाराच्या दरम्यान अतिशय उत्सहाने वायनाड मध्ये प्रचार केला आणि सभा सुद्धा घेतल्या आणि राखीव जागेवरुन त्या प्रचंड मताधिक्याने निवडून आल्या. आज त्यांनी संसेदत प्रवेश केला आणि खासदारकीची शपथ घेतली.
गांधी परिवारातील आता तिघेही हे संसदेच्या सभागृहात लोकांना बघायला मिळणार आहेत.त्याचबरबोर वायनाडच्या लोकांसाठी आणि त्यांचा हक्कांसाठी त्या आता आवाज सुद्धा उठवताना दिसतील.