त्रिभाषा सूत्र शासन राज्यात लागू करणार आणि बालपणापासून त्या मुलांना तुम्ही म्हणणार की तुम्ही तुमची मातृभाषा ही शिका आणि बाकीच्या दोन भाषा सुद्धा शिका! त्यात काही वाईट नाही, पण बालपणापासून जर का मूलं आपल्या भाषे सोबत आणखी दोन भाषा नियमित शिकत आहेत.
पुस्तकं त्यांची त्या भाषेत आहेत. लहानपणापासून त्यांच्यावर तीनही भाषेमध्ये शिकण्याचे संस्कार होत आहेत. त्यामुळे मग ते सहज त्या भाषा शिकतात.
त्यांच्या सभोवताली त्या भाषेत बोलणारे लोकं तिथे असतात. त्यामुळे ते त्या भाषा शिकतात.
मात्र ह्या भाषा बालपणापासून जर का ते शिकत असतिल आणि त्यांना त्या प्रकारच वातावरण मिळत असेल तर पुढे त्यांना त्या भाषा बोलायला अवघड वाटणार नाही. आणि त्यामुळे आपल्याकडे आपल्याला बघायला मिळते की आपल्याकडील लोकं ज्यांची मातृभाषा ही मराठी आहे ते सहजासहजी त्यांना बालपणापासून शिकविल्या गेलेल्या भाषांमध्ये व्यवहार करत आहेत.
कार्यालयात म्हणा किंवा मग शाळा महाविद्यालयात म्हणा किंवा मग सार्वजनिक ठिकाणी म्हणा किंवा हॉटेलात किंवा मग बाजारात किंवा रेल्वे स्थानकावर म्हणा किंवा बसस्थानकावर आपल्याला आपल्याकडील लोकं सहजपणे ज्या भाषा ते बालपणापासून शिकले आहेत त्या भाषांमध्ये व्यवहार बाहेरील प्रदेशातून येणार्या लोकांसोबत करत आहेत.
बाहेरून येणार्या लोकांची संख्या आपल्याकडे काही कमी नाही आणि बाकीच्या राज्यात सुद्धा त्यांची संख्या काही कमी नसते. कोणी व्यवसायानिमित्त प्रवास करतात. कोणी रोजगारानिमित्त प्रवास करतात आणि कुणी लोकं फक्त वेगवेगळया राज्यातील पर्यटन स्थळे बघण्यासाठी येतात आणि प्रवास करत असतात.
त्यामुळे आपल्याकडे येणार्या लोकांसोबत, आपल्याकडील व्यावसायिक. छोटे मोठे दुकानदार, लोकं आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट च्या माध्यमातुन सेवा पुरविणारे लोकं सहजपणे या लोकांसोबत व्यवहार करू शकतात. हे आपल्याला बघायला मिळते.
अधिक भाषा शिकणे कधीही वाईट नसते. आणि जर का ह्या भाषा मूलं किंवा लोकं बालपणापासून शिकत आहेत तर त्या भाषा त्यांना विसरणे सुद्धा शक्य नाही आणि जर का त्यांना त्या प्रकारच वातावरण मिळत असेल तर त्या भाषा ते विसरू शकणार नाहीत.
आता या भाषा शिकल्यामुळे बाहेरून येणार्या लोकांसोबत आपली व्यावसायिक किंवा व्यापारी लोकं सहजपणे व्यवहार करू शकतात आणि आपल्या देशात मुघल येऊन गेले. निजाम येऊन गेले. पोर्तुगीज येऊन गेले. आपल्याकडे इंग्रज येऊन गेले तर त्यांनी आपली संस्कृती आणि भाषा सुद्धा आपल्या समाजात पसरवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आपल्याला बघायला मिळते की वेगवेगळया भाषा बोलणारे वेगवेगळी संस्कृति असलेले लोकं आत्ता सुद्धा वेगवेगळ्या प्रदेशात स्थिरावलेले आहेत.
असो, मात्र आता सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकं आपल्याकडे येतात व्यापारासाठी आणि रोजगारासाठी आणि पर्यटनासाठी. राज्य शासनाचा कारभार जरी त्या त्या राज्याच्या मातृभाषेत शासनाच्या कार्यालयात चालत असला तरी केंद्र शासनाचा कारभार काही एका राज्याचा ठराविक भाषेत चालत नाही.
कारण पंजाब मध्ये वेगळी भाषा बोलल्या जाते. बंगाल मध्ये वेगळी भाषा बोलली जाते. गुजरात, राजस्थान मध्ये वेगळी भाषा बोलली जाते. आसाम, मणिपूर,हिमाचल, तिकडे केरला, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, आसाम, महाराष्ट्र, झारखंड आणि छत्तीसगड मध्ये वेगवेगळया भाषा या बोलल्या जातात.
आता ही राज्ये संघटित भारताची अविभाज्य घटक आहेत. तर केंद्रीय कर्मचार्यांना जिथे जिथे बदली होईल तिथे तिथे जाव लागत आणि तिथे तिथे काम कराव लागतं हे आपल्याला बघायला मिळत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वेगवेगळया राज्यातून सरकारी कर्मचारी सुद्धा या किंवा त्या राज्यात कामानिमित्त बदली होऊन दर वर्षी येत असतात. हे बघायला मिळत. त्यामुळे मग ते राज्य कोणतही असो आपल्याला बघायला मिळते की नौकरीपाण्याच्या निमित्ताने किंवा मग व्यवसायानिमित्त आपल्या देशातील लोकं वेगवेगळया राज्यात स्थायिक होत आहेत आणि तो हक्क संविधानाने देशाच्या प्रत्येक नागरिकाला दिलेला आहे.
आता प्रश्न हा की जेव्हा लोकं वेगवेगळया भाषा जेव्हा शिकत आहेत तर मग आपली भाषा कशी वाचवायची? हा प्रश्ण —राजकारण्यांना नेहमी पडणारा असतो आणि त्यासाठी नेत्यांचा त्रागा होताना बघायला मिळतो.
मात्र लोकांनी अधिक भाषा शिकल्याने काय त्यामुळे आपल्या भाषा संकटात येतील? कदाचित अस होईल ही जर का आपन फक्त बाहेरील भाषेला अधिक मह्त्व देत राहू आणि आपल्या भाषेकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष हे होत राहील . अधिक भाषा काही शिकल्याने आपल्या भाषा संकटात येणार नाही मात्र आपण जर का आपल्या भाषा विसरायला लागलो आणि शाळा ,महाविद्यालयांमध्ये सुद्धा जर का आपल्या भाषांना स्थान मिळणार नाही आणि लोकांच्या जिभेवर त्या भाषा राहणार नाही तर पुढे ती भाषा अस्तित्वात राहणार कि नाही हा मात्र प्रश्न असेल .
आणि ही सुद्धा सत्य परिस्थिती आहे की आम्ही परकीय भाषांच वलय बघून आपल्याला भाषेला नगण्य स्थान देत आहोत आणि त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळत आहे. अस व्हायला नको! वेगवेगळया भाषा आपन जेव्हा शिकत आहो तेव्हा आपली भाषा सुद्धा वाचायला हवी आणि ती नामशेष होऊ नये !
त्यामुळे बालपणापासून आपल्या भाषेबद्दल आपल्या मुलाबाळांत. आपल्या लोकांत प्रेम असायला हव. दक्षिणे मध्ये हे बघायला मिळते. त्याच बरोबर. उत्तरे मध्ये सुद्धा आपल्याला हे चित्र बघायला मिळत. उत्तरे मध्ये आणि दक्षिणे मध्ये आणि तिकडे पूर्वेला आणि पश्चिमेला सुद्धा ते लोकं आपापल्या भाषेला बरच जपताना दिसतात. मात्र आपल्याकडे मात्र तस काही होताना दिसत नाही. आपल्याकडे लोकं अगदी अष्टपैलू कामगिरी करतांना दिसतात. म्हणजे ते सगळ्याच भाषा बोलण्याचा प्रयत्न करतात. सगळ्याच भाषा बोलण्याचा ते प्रयत्न करतात ते ठीक आहे. मात्र हे होत असतांना ते आपली भाषा विसरतात आणि त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळते या दिवसांत. आपल्याकडे या इंग्रजी शाळा वेगाने वाढत आहे हे बघायला मिळते .
आपण जर फक्त महाराष्ट्रातील पाच शहरच बघितली म्हणजे मुंबई , पुणे , नागपूर , नाशिक , ठाणे तर मुंबई मध्ये या शाळा ३५० पेक्षा अधिक आहेत , तर पुणे येथे त्याच इंग्रजी शाळांची संख्या ही ९५० हून अधिक आहे त्याचबरोबर नागपूर मध्ये त्या शाळांची संख्या ही ६५० हून अधिक आहेत , नाशिक मध्ये त्यांची संख्या ही ४५० पेक्षा आधी आहे तर हे बघायला मिळत.
तर या शाळांमध्ये बाकीच्या भाषा सुद्धा शिकवल्या जातात मात्र , मातृभाषा ही मुख्य भाषा नसते. त्यामुळे मग अनेक विद्यार्थ्यंचा सुरवातीच्या काळात आणि नंतर सुद्धा गोंधळ उडताना दिसतो . कारण शाळेमध्ये ते वेगळ्या भाषेत शिकतात आणि त्यांचा जगात त्यांना वेगळ्या भाषा शिकायला मिळतात . आणि शासनाच्या शाळा ह्या वेगाने कमी होताना दिसतात जिथे मातृभाषेत मुलांना शिक्षण दिल्या जाईल . त्यामुळे हे बघायला मिळते कि इंग्रजी भाषांच्या शाळा ह्या विस्तारत चालल्या आहेत आणि त्याच वेगाने मराठी शाळा बंद होत चालल्या आहेत . गेल्या दहा वर्षात एकट्या मुंबई मध्ये जवळपास मराठी माध्यमाच्या शंभरहून अधिक शाळा बंद पडल्या आहेत . २०१९ ते २० च्या दरम्यान मुंबई मध्ये ४६१ मराठी शाळा होत्या त्या २०२४ ते २५ मध्ये ४२१ राहिल्या आणि या शाळांमध्ये इंग्रजी शाळांची संख्य्या वाढण्यामुळे, अतिशय वेगाने मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची दाखले आणि उपस्थिती कमी होण्याची परिस्थिती अनुभवायला मिळाली .
हा डेटा ( हिंदुस्थान टाइम्स ) या इंग्रजी वृत्तपत्रात १३ मे २०२५ मध्ये आलेल्या लेखातून घेतल्या गेला आहे .







