महाराष्ट्र असो अथवा मग देशातील इतर बाकीचे राज्य असो. भारत हा खेड्यांचा देश आहे आणि आपल्या देशातील असंख्य खेड्यांमधील लोकांची आर्थिक परिस्थिती ही तितकी चांगली नसते की ते खाजगी शाळेमध्ये प्रचंड पैशे घेऊन त्या शाळांमध्ये आपल्या मुलांना दाखल करतील.
आर्थिक परिस्थिती आणि जाती वादाचे चटके भारतीय समाजातील अनेको जातीतील लोकांना दररोज पडत असतात. सगळेच जवळपास भारतीयच मात्र पिढ्यानपिढ्या जातीपाती मध्ये विभागल्या गेल्या मुळे अनेको गावा खेड्यांत या लोकांची परिस्थिती वाईट असते. यांना अनेक सोई सुविधांपासून आता सुद्धा दूर ठेवल्या जात आणि हे मुद्दाम केल्या जात आणि त्यामुळे एका वर्गाला प्रगती करण्याची संधी मिळते तर खूप मोठ्या वर्गाला प्रगती पासून दूर ठेवल्या जात आणि त्यामुळे आपल्याच भारतीय समाजात खूप मोठी दरी निर्माण होते.
तर आमच्या इकडे खेड्यांमध्ये अनेको लोकांची परिस्थिती वाईट आहे. सरकारला त्यामुळे अनेक योजना आणाव्या लागतात. त्यांचा जीवनाचा रहाटगाडगं चालवण्यासाठी आणि त्यांच्या कडे तितका पैसा नसतो की ते त्यांच्या मुलांना खाजगी शाळेत घालू शकतील आणि या परिस्थितीमध्ये, जर शासनाने सुरू केलेल्या अनुदानित शाळा जर का धडाधड बंद होत असतिल तर हे मूलं शिकणार कुठे ?
की यांचा मुलांनी जीवनभर हमालीच करावी. जर शिक्षण नसेल तर या मुलांच आणि त्यांचा परिवाराच सुद्धा जीवन हे अंधकारमय असेल आणि जर का आमचा जो तरुण युवा वर्ग असेल, जर का तो शिकलेला नसेल तर हे देशाच खूप मोठ नुकसान असेल.
सरकारला या अशिक्षित वर्गाला प्रत्येक वर्षी मोफत अन्न वाटाव लागेल. अनेक योजना या लोकांचा जीवनाचा रहाटगाडगं चालवण्यासाठी आणाव्या लागतील तर अश्या प्रकारची परिस्थिती ही पुढे आणि सतत सतत निर्माण होईल. त्यामुळे आज आमच्या भारतीय समजाला शिक्षित करने त्याचबरोबर शासनाचा शाळांचा फायदा खेड्यातील गरिबातील, गरीब परिवाराला होणे आज आवश्यक आहे.
शासनाच्या सरकारी शाळा बंद होत गेल्या तर अनेको मुलांच जीवन अंधकारमय होईल.मात्र शासनाच्या अश्या शाळांमध्येच इंग्रजी सुद्धा सुरू केली तर जेणेकरून मुलांना इंग्रजी भाषा सुद्धा शिकायला मिळेल. मात्र शासनाचा शाळा नक्कीच बंद वहायला नको हव्यात.
त्या एवजी शाळा सुंदर व्हायला हव्यात. त्यात मुलांसाठी अप्रतिम सुविधा मुलांना मिळायला हव्यात. त्यामुळे आपल्याकडे प्रतिभावान आणि गुणवंत मुलांची खान निर्माण होईल आणि ती मूल समोर जाऊन आमचा समाज आणि देश सुंदर बनवतील.