हॉटेलच्या मालकाने यासंदर्भात स्पष्टीकरण दिले. आम्ही केवळ खाद्य तेलाचा वापर करतो आणि ग्राहकांना चांगल्या दर्जाचे जेवण देतो, असे हॉटेलचा मालक म्हणताना व्हिडिओ दिसतो. या व्हिडिओनंतर युजर्सकडून अनेक कॉमेंट करण्यात आल्या.सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी एका फूड ब्लॉगरने ‘डिझेल पराठा’चा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. परंतु त्यानंतर जे घडले त्यामुळे त्या फूड ब्लॉगरला माफी मागावी लागली. हॉटेलच्या मालकास स्पष्टीकरण द्यावे लागले. हा व्हायरल व्हिडिओ चंदीगडमधील एका रस्त्यावरील हॉटेलचा होता.