भारताने पाकिस्तान विरुद्ध सिंदूर हे मिशन सुरु केले होते आणि या दरम्यान पाकिस्तानच्या वेगवेगळ्या शहरांवर भारतीय वायुदलाकडून, सन्यदलाकडून आणि नौवसेनेकडून हल्ला करण्यात आलं होता. हे मिशन पाकिस्तानच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सुरु करण्यात आलं होत.
आणि पाकिस्तानला यातून कठोर संदेश पाठवण्याचा प्रयत्न हा भारत सरकारकडून करण्यात आला आणि यात भारताला यश सुद्धा मिळालं. त्यानंतर भारताने आपल्या कडून वेगवेगळ्या देशात आपलं शिष्टमंडळ हे भारताची बाजू मांडण्यासाठी आणि पाकिस्तान च्या कुरापती बद्दल जगाला कळावे म्हणून हे शिष्ट मंडळ पाठवण्यात आले होते.
तर हे शिष्टमंडळ शेवटी आपली जबाबदारी पार पाडून वेगवेगळ्या देशातून परतले आणि या दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी वेगवेगळ्या देशांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध शिष्टमंडळांच्या सदस्यांची भेट घेतली आणि शांततेसाठी भारताची वचनबद्धता आणि दहशतवादाच्या धोक्याचे उच्चाटन करण्याची गरज यावर सविस्तर चर्चा केली.
त्यांनी ज्या पद्धतीने भारताचा आवाज उठवला त्याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे. असं पंतप्रधान मोदी या शिष्टमंडळा ला भेटल्या नंतर म्हणाले.