प्रत्येकाचा घरी पूर्वी आंब्याची झाडे असायची. पेरूची झाडे असायची. निंबाच्ची झाडे असायची. कुणाकुणाच्या घरी चिंचेची सुद्धा झाडे बघायला मिळायची. कडू निंबाच्ची झाडे सुद्धा कित्येकांची घरी दिसायची. कुणाच्या घरी सीताफळाची झाडे दिसायची तर कुणाकडे पपईची सुद्धा झाडे बघायला कित्येकदा मिळायची.गावात कित्येकदा आमराई सुद्धा बघायला मिळायच्या. मात्र हळूहळू लोकांना काय झाल कुणास माहीत. लोकांनी आपल्या घराचा आवारात झाडे आणि फळांची झाडे सुद्धा ठेवणे किंवा लावणे कमी करून टाकल. त्यामुळे संपूर्ण गावात आज आपन फिरलो तरी कुणाच्या घरी आम्हाला ना पेरूच झाड दिसत ना आंब्याच झाड दिसत, ना चिंचेच झाड दिसत.
प्रत्येकाला या दिवसांत फक्त आणि फक्त आपल्या मोठमोठ्या इमारती उभ्या असलेल्या बघायला आवडते मात्र त्या इमारतीचा अवतीभवती किंवा आवारात त्यांना झाडे नकोशी वाटतात. त्यामुळे आजच्या मुलांची म्हणजे जे आता शाळेत वगैरे जातात. त्यांना प्रत्यक्षात पेरूच झाड कोणते,आंब्याचे झाड कोणते. पपईच झाड कस असतं. चिंचेच झाड कस असत या बद्दल महिती नसते. जे काही त्यांना बघायला मिळते ते त्यांच्या शाळेच्या पुस्तकात किंवा टीव्ही किंवा फोनवर बघायला मिळत.आता घरात किंवा आवारात फळांची झाडेच नसल्यामुळे, मुलांना झाडावरील आंबे खाली कशे पाडावे किंवा झाडावर चढून आंबे किंवा पेरू किंवा मग चिंचा कशाप्रकारे आणावे याची कल्पना येत नाही आणि तो आनंद सुद्धा त्यांना त्यामुळे मिळत नाही. आता घराचा आजूबाजूला फळांची झाडे नसल्यामुळे, त्या झाडांची फळे खाण्यासाठी किंवा चाखण्यासाठी पक्षी सुद्धा त्या गावात येत नाहीत. त्यामुळे मग मुलांना, चिमण्या पाखरं कशे असतात आणि कश्या प्रकारे फळ खाण्यासाठी ते सर्व भांडण करतात आणि चिवचिवाट करतात हे बघायला मिळत नाही आणि तो बघण्याचा आनंद सुद्धा मुलांना अनुभवता येत नाही.
झाडे नसल्यामुळे मग पोपटं सुद्धा त्या गावातील पेरू किंवा चिंचा किंवा आंबे खाण्यासाठी येताना दिसत नाही. नाहीतर पूर्वी पोपटांचा थवा चा थवा एखाद्या फळ असलेल्या झाडावर येऊन बसल्याच चित्र लोकांना बघायला मिळत असायच आणि फळे असल्यामुळे मग त्या पक्ष्यांचा मुक्काम सुद्धा त्या गावात कित्येक दिवस असायचा असा अनुभव लोकांना यायचा आणि मुलांच सुद्धा त्यामुळे प्रचंड मनोरंजन व्हायच. तर आपल्या घराचा आवारात साध निंबाच् सुद्धा झाड नसल्यामुळे अनेकांना आज एक नींबु विकत घेण्यासाठी बाजारात जाव लागतं आणि त्या एका निंबा साठी बायकांना सरळ करकरीत नोट पन्नास ची भाजी वाल्याच्या हातात द्यावी लागते जर का त्यांना नींबु अधिक हवे असतिल त्याचबरोबर बाकीचा फळांचा किमती सुद्धा प्रचंड वाढलेल्या आम्हाला बाजारात गेल्यावर कळते. म्हणजे जे फळ जेव्हा प्रत्येकाचा घरी झाडे असताना संपूर्ण गावाला पुरतील एवढे असायचे. तीच फळं आज बाजारात जाऊन अव्वाच्या सव्वा किमतीला विकत घ्यावी लागतात. आता काय करणार फळं तर खायची आहेत. मग आता किमती त्याचा कितीही आकाशाला भिडल्या असेल तरीही चालेल . मात्र फळांची झाडे नसल्यामुळे नुकसान हे आमचाच आहे आणि बाकीचे सुद्धा झाडे आमचा करिता महत्त्वाची असतात. वेगाने होत जाणार्या शहरीकरणामुळे लोकांनी झाडे तोडायला सुरवात केली आणि आज संपूर्ण शहरात आम्ही फिरलो तर आम्हाला झाडे दिसणार नाही. जिथे झाडे नसेल तिथे जमिनीची धूप सुद्धा प्रचंड प्रमाणात होत आहे हे चित्र आम्हाला बघायला मिळते. जमिनीत ओलावा पकडून ठेवण्याची क्षमता नसल्यामुळे आणि आजुबाजुला झाडे नसल्यामुळे, रस्त्यावरून गाड्या गेल्या की प्रचंड धूळ हवेत उडताना दिसते आणि यामुळे वाहन चालवणार्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. झाडे नसल्यामुळे हवेतील प्राणवायूचे प्रमाण प्रचंड प्राणात कमी होत जात. झाडे नसल्यामुळे हवा प्रचंड प्राणात प्रदुषित होते. झाडे नसल्यामुळे कार्बन डाय ऑक्साईडच प्रमाण हवेत अधिक वाढतं त्यामुळे लोकांना त्या दूषित हवेत श्वास घेण्यास अधिक त्रास होऊ लागते आणि अश्या प्रदुषित हवेमुळे अनेक आजार लोकांना नकळत पणे होतात. झाडे नसल्यामुळे मातीचा ओलावा टिकून राहत नाही. झाडे नसल्यामुळे जमिनी ओसाड पडतात आणि त्यामुळे हळूहळू त्या जमिनी वाळवंटात रुपांतरीत होतात. झाडे नसल्यामुळे पक्ष्यांचं आणि प्राण्यांच जीवन संकटात येत त्याचबरोबर त्यांची उपस्थिती आम्हाला आमचा गावात सुद्धा दिसत नाही. तर अशे दुष्परिणाम आपल्याला आपल्या समाजात होताना दिसतात. अश्या प्रकारे आपल्या निसर्गाचा समतोल आम्हाला ढासळताना दिसतो. वायू प्रदूषण, जल प्रदूषण, मातीच प्रदूषण, ध्वनि प्रदूषण यामुळे सुद्धा समाजात लोकांना आणि प्राण्यांना सुद्धा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे अस अनुभवायला मिळतो. जल प्रदूषणामुळे नद्या, तलावं, विहारी, पाण्याचे स्त्रोत प्रचंड प्रदुषित झाल्यामुळे त्याचा त्रास समाजातील सगळ्या लोकांना सहन करावा लागत आहे अस आम्हाला दिसत. त्यामुळे जागरूकता असणे आणि या निसर्गाच समतोल असंतुलित करणाऱ्या गोष्टींकडे लोकांनी आणि प्रशासनाने सुद्धा काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे हे आज आम्हाला समजणे आवश्यक आहे. पर्यावरण दिवस फक्त साजरा करून अर्थ नाही तर त्या दृष्टीने काम होणे सुद्धा आवश्यक आहे नाहीतर आम्हा सर्वाना त्याचे दुष्परिणाम अनुभवावे लागतील. फक्त इमारतींचं जंगलात आम्ही राहत आहोत हे चित्र आम्हाला बघायला मिळेल आणि तिथे हवा सुद्धा आम्ही कृत्रिम घेतो आहोत असं चित्र येणाऱ्या वर्षात दिसेल त्यामुळे अशे परिणाम आम्हाला पुढे बघावे लागू नये यासाठी पर्यावरणाचा संतुलनाकडे काळजीपूर्वक लक्ष देणे आज आवश्यक आहे .