बिल गेट्स हे कमालीच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. होय तेच बिल गेट्स जे मायक्रोसॉफ्ट या कंपनी चे सहसंस्थापक आहेत. जीवनभर प्रचंड परिश्रम करून मायक्रोसॉफ्ट उभ केल आणि त्या माध्यमातून अनेकांना जगभरात रोजगार सुद्धा मिळाला कॉम्प्युटर सॉफ्टवेअर च्या जगात त्यामुळे अनेक चांगले बदल लोकांना बघायला मिळाले आणि लोकांच्या जीवनात त्यामुळे अनेक चांगले बदल आलेत नक्कीच त्यामागे बिल गेट्स साहेबांचे आणि त्यांच्या सहकार्यांचे सुद्धा त्यामागे प्रचंड परिश्रम होते.
तर बिल गेट्स यांना आपल्या क्षेत्रा व्यतिरिक्त समाजातील वेगवेगळया लोकांचे प्रश्ण समजून घेऊन त्या सोडविण्याची सुद्धा आवड आहे आणि त्याकरिता ते नेहमी कुठे ना कुठे कधी या देशात तर कधी त्या देशात लोकांच जिवन, संस्कृती, त्यांचे प्रश्ण आणि समस्या समजून घेण्यासाठी प्रवास करत असतात आणि त्या लोकांमध्ये मिसळून आणि त्या लोकांसोबत बसुन ते त्या लोकांचे प्रश्ण, त्यांच्या संस्कृती बद्दल त्यांचा जीवना बद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांना सहकार्य करण्यासाठी सुद्धा ते समोर असतात.
एवढ प्रचंड यश त्यांचा पदरी आल्यानंतर सुद्धा हा माणूस किती जमिनीवर आहे आणि किती नम्रपणे ते लोकांमध्ये वावरतात आणि मिसळतात हे जेव्हा आपन अनुभवतो त्यावेळी नक्कीच आपल्याला ही त्यातून काहीतरी शिकायला मिळते. सोशल मीडियाच्या जगात भटकंती करत असताना मला कित्येकदा यांचे लेख वेगवेगळया विषयावरचे आणि त्यांचे छायाचित्र सुद्धा कधी बालपणीचे तर कधी त्यांच्या तारुण्यातील तर कधी त्यांच्या संपूर्ण परिवारा सोबतचे तर कधी त्यांच्या सहकार्यांसोबतचे छायाचित्र बघायला मिळतात.
बाकीच्या सगळ्या लोकांसारख मी सुद्धा त्यांचे छायाचित्र, लेख वगैरे जीज्ञासु वृत्तीने कधी कधी बघण्याचा आणि वाचण्याचा प्रयत्न करतो. त्यांचे लेख अप्रतिम असतात आणि त्यामागे अभ्यास असतो. त्यातून नक्कीच प्रेरणा मिळते आणि शिकायला मिळते. ते एक उत्तम लेखक सुद्धा आहेत त्यांनी त्यांचे लेख आपल्याला (gates notes) या त्यांच्या पानावर वाचायला मिळतात. त्याचबरोबर,
- How to prevent the next pandemic
- How to avoid the climate disaster
- Unleashing the power of creativity
- Source code
अश्या प्रकारची आणखी सुंदर पुस्तके त्यांनी लिहलेली आहेत.
त्या पुस्तकांतून सुद्धा आपल्याला खूपशा गोष्टी कळतात आणि समजतात.
त्याचबरोबर त्यांना प्रवास करायला आवडतो हे त्यांच्या वेगवेगळ्या देशात ते जात असतात आणि तिथे भेटी देत असतात त्यावरून कळत.
तर यंदा भारतातील कडक उन्हाळ्याचा दिवसांत ते परत एकदा भारत भेटीवर आलेले आहेत. त्यांना भारतीय संस्कृती, इथल्या लोकांची आव्हाने सोडविण्याची जिद्द आणि ह्या गोष्टी प्रेरणा देतात कदाचित त्यामुळे ते परत एकदा भारत भेटीवर आलेले आहेत .
त्यांना शेतकर्यांच्या समस्या, बालकांच्या समस्या, स्त्रियांच्या समस्या आणि गरिबांच्या समस्या, आरोग्याशी निगडित असलेल्या समस्या अश्या प्रकारच्या समस्या ते समजून घेण्याचा प्रयत्न करतात त्याचबरोबर भारतात येण्याचा त्यांचा आणखी एक उद्देश म्हणजे भारतात आणखी काय बदल झालेले आहेत ते बघायचे आहेत आणि अनुभवायचे आहेत अस ते म्हणतात.
भारतात येतांना त्यांनी आपल्या सोशल मीडिया हॅन्डल वर पोस्ट टाकून म्हंटल होत की मी भारतात जात आहे. कदाचित हा लेख् लिहीत पर्यंत त्यांचा आगमन झालेल असेल आणि अनेक ठिकाणी ते भारतात या कडक उन्हाळ्याचा दिवसांत सुद्धा लोकांच्या समस्या आणि भारतातील परिस्थिती समजून घेण्यास फिरले सुद्धा असतिल.
तर एवढ्या कडक शरीर भाजणाऱ्या उन्हाळयात ते भारतात फक्त भारताबद्दल आपुलकी आणि भारताला जाणून घेण्यासाठी आले त्यामुळे त्यांच नक्कीच भारतात स्वागत आहे.