माझा एका गोष्टीवर ठाम विश्वास आहे आणि तो म्हणजे आपल्याकडे प्रत्येक रस्त्यावर पथदिव्याचे खांब असणे. मात्र त्याचबरोबर माझा या गोष्टीवर सुद्धा विश्वास आहे की त्या प्रत्येक रस्त्यावर सर्व पथदिवे सुरळीतपणे आणि निर्दोषपणे कार्यरत आहेत कि नाही हे जाणून घेणे, जेणेकरून या रस्त्यावरून वाहन चालवणाऱ्यांना किंवा पायी चालणाऱ्यांना या मार्गावरून जाताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये.
आपल्याकडे खेड्यापाड्यात, तालुक्याच्या ठिकाणी आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जमिनीवर काम करणाऱ्या लोकांची म्हणजे ग्रामपंचायतींचा, नगरपरिषदेचा , महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची आणि तिथल्या नेत्यांची सुद्धा हि जबाबदारी आहे परंतु, आपण अनेकदा बघतो की वर्षभरात अनेक वेळा हे पथदिवे कार्यरत नसतात आणि या रस्त्यांवर पुरेसा प्रकाश नसल्यामुळे वाहने एकमेकांवर आदळताना दिसतात आणि या गोष्टी सातत्याने घडत असतात कारण जमिनीवर जे लोक, लोकांसाठी काम करायसाठी बसलेले आहेत ते कुठेतरी प्रामाणिकपणे काम न करता भ्र्रष्टाचार करण्यात मग्न असतात.
त्यामुळे कित्येकदा अनेक रस्त्यांवर पथदिवे असले तरी त्यांचा काहीशी उपयोग तिथून ये जा करणाऱ्या लोकांना होताना दिसत नाही कारण ते पथदिवे वर्षभरही कार्यरत नसतात आणि तिथले ग्रामपंचातींचे कर्मचारी किंवा महापालिकेचे कर्मचारी ह्या गोष्टी माहिती असताना सुद्धा या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतात आणि लाच घेण्यात वाईटरित्या गुंतलेले असतात, भ्र्रष्टाचार करून करूनच ते हळूहळू अशा प्रकारे श्रीमंत होतात; आणि इथे या सर्व रस्त्यावर लोकं त्यांच्या जाणूनबुजून केलेल्या चुकांमुळे रोज मरतात.
हे वास्तव अनेकवेळा आपल्याला समजत नाही आणि या क्षेत्रात आपल्या सरकारला प्रचंड काम करण्याची गरज आहे . जेणेकरून लोकांना चालताना आणि त्यांची वाहने चालवताना त्रास होऊ नये आणि त्यांना रात्री सुरळीतपणे गाडी चालवता येईल आणि निर्भयपणे चालता येईल आणि आपल्या सर्वांना माहित आहे की ही भारतातील एक मोठी समस्या आहे.
प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात, तालुक्याच्या ठिकाणी लोकांना प्रचंड समस्यांना सामोरे जावे लागते परंतु आपण पाहतो की दरवर्षी त्यांना त्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे आणि त्यांचा काहीही दोष नसताना अनेक लोक आपला जीव गमावत आहेत परंतु आमच्या या समस्या आम्हाला गंभीर वाटत नाहीत आणि आम्ही लोकांना फक्त दाखवण्यासाठी काही वेळा पथदिव्यांचे खांब लावतो.
मात्र रात्रीच्या वेळी अनेक रस्त्यांवर लोकांना हे पथदिवे काम करत नसल्याचे अनुभवास येते आणि तरीही लोकं या रस्त्यावरून दररोज येन जण करतात आणि पुरेसा प्रकाश रस्त्यांवर नसल्या मूळे कित्येकदा तिथे त्या लोकांचा अपघाताने मृत्यू होतो.
तर हे अश्या प्रकारचं क्षेत्र आहे जिथे आमच्या सरकारला काम करणे आज आवश्यक आहे कारण काही भ्रष्ट लोकांच्या चुकांमुळे निष्पाप लोक दररोज आपला जीव गमावतात.