पावसाळा संपत आलेला आहे आणि हिवाळ्याची चाहूल हळूहळू लागायला सुरवात झालेली आहे. महाराष्ट्रातील काही भाग अशे आहेत जिथे आतापासून पाण्यासाठी साठी तजवीज आणि उपाययोजना सुरुवात करणे आवश्यक असते किंवा याबद्दल उपाययोजना खूप आधी पासूनच सुरवात व्हायला हव्या मात्र राज्यात कोणाचाही सरकार आल तरी या गंभीर समस्येकडे या पुढाऱ्यांच लक्ष् जात नाही किंवा लक्ष गेल तरी त्यांना ते प्रश्ण मुळीच गंभीर वाटत नाही आणि जर गंभीर असेलही तरी यांच्या कडे वर्षोनुवर्षे या गंभीर समस्येवर उत्तरे नाही. यांचे नेते लोकांना वेगळया गोष्टीत गुंतवून ठेवतात. महाराष्ट्रातील काही भागात प्रचंड गरीबी आणि दारिद्र्य आहे आणि काहीच लोकं तिथे लखपति आणि करोड़पति होऊन बसले आहेत आणि हे लोकं या दारिद्र्यात आणि शिक्षणाविना असलेल्या लोकांचा सातत्याने फायदा उचलत असतात. तर गरीबी असल्यामुळे तिथे जातिवाद ही आहे आणि यात तिथले पाटिलकी करणारे लोकं या लोकांना दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतात यांना शिक्षणा विनाच ठेवण्याचा प्रयत्न करतात. मग ते कोणीही का न असोत ते जर गरीब नाही राहिले तर यांचे मतं कशे वाढतील आणि कोण यांची हमाली करणार? त्यामुळे मग मुद्दाम अश्या प्रकारे त्या लोकांना जातीपातीच्या चक्रात अडकवल्या जाते. मुद्द्यावर येऊया, महाराष्ट्रातील काही भागात हिवाळ्याच्या सुरवातीपासून दुष्काळाच्या झळा बसायला सुरवात होतात आणि जस जस उन्हाळा जवळ यायला लागतो तस तस तिथे प्रचंड प्रमाणात पाण्याची टंचाई जाणवायला लागते. लोकांना त्यामुळे गावे च्या गावे सोडावी लागतात. महिलांना कित्येक किलोमीटर पायपीट करावी लागते तरीसुद्धा त्यांना घडा भर पाणी आपल्या छोट्या छोट्या लेकरांना पाजण्यासाठी मिळत नाही. अंघोळी साठी पाणी मिळत नाही, अन्न शिजवायला पाणी मिळत नाही, अश्या हजारोंना शौचास जर गेले तर ढुंगण धुवायला पाणी मिळत नाही. गुरांना प्यायला पाणी मिळत नाही. गुरे पाण्याविना भटकू भटकू दम तोडतात. मात्र तिकडच्या लोकांना हे प्रश्ण अतिशय शुल्लक वाटतात. त्या एवजी यांचा पैसा ओतला जातो क्रिकेटचे मैदाने तयार करण्यासाठी आणि तमाशांमध्ये वेश्यांना आणि नाचणार्या बायकांना नाचविण्यासाठी. काय परिस्थिती काय आहे? प्रचंड गरीबी, शेतकऱ्यांचे प्रचंड हाल, पाण्याचे दुर्भिक्ष, पोरांना रोजगार नाही, ना व्यवसायासाठी त्यांना उत्तेजना देणारे लोकं. बैलगाड़ा शर्यत तिथल्या गावागावात भरविल्या जातात मात्र त्या बैलगाडा शर्यतीतून तिथल्या गरीब शेतकर्यांच् काहीही आर्थिक फायदा होताना दिसत नाही, ना तिथल्या शेतकर्यांच्या जीवनामध्ये काही सकारत्मक व चांगले बदल होताना दिसतात. त्याचबरोबर तिथली मुले पैलवानगिरी करण्यात म्हणजे आखाड्यात कित्येक वर्ष घालवतात मात्र त्यात सुद्धा त्या मुलांना समोर काही मोठ भविष्य नाही तर ही उदासीनता आहे आणि त्यामुळे गावात सगळेच गरीबच्या गरीब दिसतात अस त्यामुळे सहजच वाटून जात की तिकडच्या पुढाऱ्यांनी आपल्या लोकांच जिवन सुधारण्यासाठी कष्ट केलेले नाहीत. पुढे, हिवाळ्या नंतर पुन्हा उन्हाळा सुरू होईल आणि तिकडच्या क्षेत्रातील पुढारी आपल्या नावाचे बॅनर लाऊन पाण्याचे टँकर गावा गावांत फिरवताना दिसतील हीच काय ती मदत ते प्रत्येक वर्षी ते लोकांना करू शकतात. बाकी तरुण पोरांना लोकांना क्रिकेट च्या मैदानांवर गुंतवून ठेवायचे आणि अश्या प्रकारे यांना मूर्ख बनवत राहायच, कारण सगळेच तिथले क्रिकेटच्या मैदानावर उतरणार नाहीत त्याचबरोबर तिथे आजकाल भ्रष्टाचार प्रचंड आहे. नेत्यांचेच मूलं किंवा नातेवाईक तिथे वर बसुन कारभार चालविताना दिसतात आणि ही बाब समाजतील विषमता दर्शविते आणि ही बाब लोकसत्ताक समाजासाठी योग्य नाही.