देशाच्या स्वातंत्रामध्ये काँग्रेसचे सर्वाधिक योगदान राहिले. इंदिरा गांधी, राजीव गांधींनी या देशासाठी बलिदान दिल. सोनिया गांधींच्या विरोधात आम्ही काही भूमिका घेतली होती . परंतु त्यांनी देखील या देशाबरोबर राहण्याची ठाम भूमिका घेतली. त्यांची पुढची पिढी देखील आज देशासाठी काम करत आहे. इंदिराजींनी तर संपूर्ण जगात भारत देशाचा स्वाभिमान दाखवून दिला होता. त्या काँग्रेसला तुम्ही नक्षलवादी म्हणता , मी या संदर्भात दिल्लीत जाऊन पंतप्रधानांना भेटणार आहे , असं राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.