ब्रिटनचे प्रिन्स विल्यम आणि प्रिन्सेस केट मिडलटन सध्या भारत दौऱ्यावर आहेत . या भारत दौऱ्यात त्यांनी मुंबई येथे सोमवारला भेट दिली . यावेळी प्रिन्स विल्यम आणि प्रिन्सस केट मिडलट्न यांनी मुंबईतील बॅलार्ड इस्टेटमध्ये मुलांसोबत गल्ली क्रिकेटचा खेळण्याचा आनंद घेतला.
या दरम्यान त्यांचा सोबत भारताचे माजी दिग्गीज आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकर सुद्धा होते.
तसेच या दौऱ्यात प्रिन्स विल्यम आणि प्रिन्सेस केट मिडलटन यांनी मुंबई शहरातील मेट्रो रेलने प्रवास करण्याचा आनंद सुद्धा घेतला त्याचबरोबर या यावेळी दोघांनीही रिक्षाने फिरण्याचा आनंद सुद्धा घेतला .
प्रिन्स विल्यम आणि त्यांची पत्नी प्रिन्सेस केट मिडलटन यांचा हा तीन दिवसांचा भारत दौरा असून , १७ नोव्हेंबर रोजी मुंबईत ‘अर्थशॉट प्राईझ’चा सहावा सोहळा होत आहे तर या सोहळ्यात त्यांची उपस्थिती असणार असून. त्यानांतर पुढे ते आणखी भारतीय स्थळांना भेट देण्याची शक्यता आहे .







