काही महिन्यांपूर्वी आम्ही मेटा च्या सुपर इंटेलिजन्स प्रयोगशाळेची स्थापना केली त्यामागे आमचा उद्देश लोकांचा हातात व्यक्तिगत सुपरिंटेलिजन्स असावा हा होता . आम्ही लोकांचा वैयक्तिक महत्वकांक्षा पूर्ण होण्यावर विश्वास करतो आणि त्यासाठी सहकार्य करण्यावर आमचा अधिक भर असतो .
त्या मार्गानेच मानवतेचा विकास हा होऊ शकतो अशा प्रकारचं मत मेटा आणि फेसबुक चे सहसंस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी व्यक्त केलं आणि त्या प्रकारे आम्ही भविष्यात सुद्धा काम करत राहू असं मत त्यांनी मांडलं.
आतापर्यंतच आमचं काम हे अधिक भक्कम वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानावर आधारित पाया निर्माण करून त्याद्वारे अधिक सक्षम आणि मोठ्या प्रकारचे मॉडेल निर्माण करण्यावर होत. .
या वेळी त्यांनी आणलेल्या आपल्या नव्या (muse spark) या मॉडेल ची माहिती दिली ते म्हणाले कि muse spark हा आता आमच्या मेटा परिवाराचा एक भाग आहे. muse spark हा मॉडेल मेटा च्या AI ला अधिक भक्कम करण्यास मदत करेल आणि हे मॉडेल तुम्ही लोक वापरून बघू शकता असं ते म्हणाले .
हा मॉडेल विशेषतःव्हिज्युअल अंडरस्टँडिंग, आरोग्य, सोशल कंटेंट, शॉपिंग, गेम्स आणि अशा अनेक वैयक्तिक महाबुद्धिमत्तेशी निगडित क्षेत्रांमध्ये अत्यंत प्रभावी आहे .
ते पुढे म्हणाले कि भविष्यात, आम्ही बुद्धिमत्ता आणि क्षमतांच्या सीमा विस्तारणारे आणखी विकसित मॉडेल्स तयार करण्याचा विचार करत आहोत , ज्या मध्ये नवीन ओपन सोर्स मॉडेल्सचाही समावेश असेल.
आम्ही अशी उत्पादने तयार करत आहोत जी केवळ लोकांचा प्रश्नांची उत्तरेच देणार नाहीत, तर तुमच्यासाठी कामे करणाऱ्या एजंटप्रमाणे काम करतील . मला विश्वास आहे की यामुळे सर्जनशीलता, उद्योजकता, विकास आणि आरोग्य या गोष्टीतून सुद्धा अधिक चालना ,मिळेल असं ते पुढे म्हणाले . (meta.ai.)







