प्रियांका गांधी यांनी शेवटी वायनाड मधून संसदे साठी नामांकन अर्ज भरला. त्यावेळी त्यांनी तिथे एक भली मोठी रॅली सुद्धा काढली आणि तिथल्या जनतेला उद्देशून भाषण सुद्धा केलं त्याच बरोबर जनतेला उद्देशून एक पत्र सुद्धा लिहून टाकलं, त्यामध्ये त्यांनी वायनाडच्या जनतेबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या, त्यांनी या पत्रात वायनाडच्या जनतेला उद्देशून म्हंटल कि, काही महिन्यांपूर्वी जेव्हा त्यांचा भाऊ राहुल गांधी यांच्यासोबत वायनाडमधील चुरमला आणि मुंडक्काई येथे गेले होते तिथे त्यावेळी भूस्खलनामुळे खूप विध्वंस झाला होता आणि तिथल्या लोकांच खूप नुकसान झाले हे त्यांनी त्यावेळी जवळून पाहिले.
त्यावेळी त्या अशा मुलांना भेटल्या ज्यांनी आपले जवळचे लोकं गमावले होते, माता ज्यांनी आपली मुले आणि कुटुंबे गमावली होती आणि ज्यांचे संपूर्ण आयुष्य निसर्गाच्या कोपाने नष्ट झाले होते हा अनुभव त्यांनी त्यावेळी सांगितलं आणि पुढे त्या म्हणाल्या कि या कठीण आणि दुःखाच्या काळात सुद्धा, तिथल्या लोकांनी एक समुदाय म्हणून त्या सर्वांनी दाखवलेल्या अफाट धैर्याने त्या प्रभावित झाल्या आणि जेव्हा त्या घरी परतत होत्या तेव्हा त्यांना जाणवले की संसदेत तुम्हा लोकांचं प्रतिनिधित्व करणे त्यांचा साठी हा खूप मोठा सन्मान असेल.
तुम्हा लोकांकडून शिकणे, तुमचे जीवन आणि तुमची आव्हाने समजून घेणे आणि एकमेकांचा आदर कसा करायचा आणि कठीण प्रसंगी एकमेकांच्या बाजूने उभे राहणे हे जाणणाऱ्या या धाडसी समुदायाचा एक भाग बनणे हा माझा सन्मान असेल,
असं त्यावेळी त्यांनी आपल्या पात्रात तिथल्या लोकांना उद्देशून म्हंटल.त्याच बरोबर , या प्रवासात तुम्ही माझे मार्गदर्शक आणि शिक्षक व्हाल अश्या प्रकारचं आवाहन सुद्धा त्यांनी लोकांना केलं लोकप्रतिनिधी म्हणून माझी ही पहिलीच भेट आहे, पण लोकांसाठी लढणारी म्हणून माझी ही पहिली भेट नाही हे तुम्हाला ठाऊक आहे .
लोकशाही, न्याय आणि आपल्या संविधानात दिलेल्या मूल्यांसाठी लढणे हा माझ्या जीवनाचा आधार आहे. मी तुमच्या पाठिंब्याने आमच्या सर्वांच्या भविष्यासाठी हा लढा पुढे नेण्यास उत्सुक आहे. तुम्ही मला खासदार केले तर मी तुमची खूप आभारी राहीन. अश्या प्रकारच्या भावना त्यांनी वायनाडच्या लोकांना उद्देशून आणि लोकसभेसाठी वायनाडमधून निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी त्या जेव्हा गेल्या त्यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.