यंदाचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा शेती, शेतीपुरक क्षेत्रं, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, मत्स्य व्यवसाय व बंदरे, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास अशा अनेक क्षेत्रांसाठी भरीव तरतूद असलेला, ‘विकसित भारत-विकसित महाराष्ट्रा’चे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा हा अर्थसंकल्प आहे.
महाराष्ट्राच्या यंदाचा अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या योजना व तरतुदी राज्याच्या भविष्यकालीन अर्थव्यवस्थेला व वाढवण बंदराच्या विकासाला बळकटी देणाऱ्या आहेत. मला विश्वास आहे की नक्कीच, विधानसभा निवडणुकीत राज्यातील मतदारांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवण्यात अर्थसंकल्प यशस्वी होईल.
या अर्थसंकल्पात मत्स्य व्यवसाय विभागाला २४० कोटी आणि बंदरे विभागाला ४८४ कोटी असे एकूण ७२४ कोटींची ही आजपर्यंतची सर्वाधिक तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. अश्या प्रकारचं मत महाराष्ट्राच अर्थ संकल्प सादर झाल्यानंतर मत्सोय्द्योग आणि बंदरे विकास मंत्री नितीश राणे यांनी व्यक्त केले . या अर्थसंकल्पामुळे राज्याचा विकासाला नवी गती निश्चितपणे मिळेल हे त्यांनी यावेळी नमूद केले. महाराष्ट्र आता थांबणार नाही
विकास आता लांबणार नाही ! असं ते शेवटी म्हणाले .