महाराष्ट्रा मध्ये बीजेपी इतकी गोंधळलेली का होती हे समजने मुळीच कठिन नाही. महाराष्ट्र मध्ये २०२४ ची निवडणूक ही लोकशाही मध्ये झालेल्या हेराफेरी ची ब्लू प्रिंट होती. इंडियन एक्सप्रेस या वर्तमानपत्रात राहुल गांधी यांनी लिहिलेल्या लेखात त्यांनी आपले विचार महाराष्ट्रातील काहीच महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीबद्दल मत व्यक्त केले. त्यांच म्हणणं अस होत की महाराष्ट्राचा 2024 च्या निवडणुकीत, निवडणूक आयोगाच्या पॅनल वर बीजेपी ने ताबा मिळवला होता.
त्याचबरोबर मतदार यादीत सुद्धा अनेक खोटे मतदार जोडल्या गेलेत असं ते म्हणाले आणि मतदानाचा काळात मतदानाची टक्केवारी ही मुद्दाम वाढवून दाखवल्या जात होती. जिथे बीजेपी ला जिंकायच होत तिथे टार्गेट करून अयोग्य मार्गाने मतदान करण्यात आल. पुराव्यांना लपविण्याचा प्रयत्न केला गेला. आणि हे समजणे मुळीच कठीण नाही अस राहुल गांधी कॉँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते लोकसभेचे आपल्या लेखात म्हणाले.
ते म्हणाले की ज्या प्रकारे क्रिकेट मध्ये मॅच फिक्सिंग होते अगदी त्याच प्रकारे निवडणुकांत सुद्धा त्याच प्रकारचा भोंगळ कारभार होतो. जो पक्ष भोंगळ कारभार करून,धोखाधड़ी करून जरी जिंकत असेल तर त्यामुळे लोकांचा निवडणुकीतील निकालावरून विश्वास उठून जातो आणि त्यामुळे लोकतांत्रिक ज्या काही संस्था आहे त्या अशक्त होण्यास सुद्धा हातभार लागतो. ते लोकांना उद्देशून म्हणाले कि आम्हाला सरकार कडून उत्तर मागितले पाहिजे आम्हाला सत्य सजून घेण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे त्याचबरोबर खऱ्या आणि खोट्याचि शहानिशा लोकांनी करून घ्यायला हवी.
आता पुढे बिहार मध्ये चे निवडणुकीचे दिवस आहेत आणि तिथे सुद्धा महाराष्ट्रा मध्ये जा प्रकारे भोंगळ कारभार झाला त्याचीच पुनरावृत्ती होऊ शकते कारण जिथे जिथे बीजेपी हरत आहे तिथे तिथे अशे कारनामे बघायला मिळतील.